शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नव्या सरकारचाही सोलापूरच्या कुंभकोणींवर विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 11:54 IST

अधिसूचनेवर स्वाक्षरी; आशुतोष कुंभकोणी यांची महाअधिवक्तापदी नियुक्ती कायम

ठळक मुद्देराज्यात सत्ताबदल झाल्यानंतरही राज्याच्या महाअधिवक्तापदी ज्येष्ठ वकील आशुतोष अरविंद कुंभकोणी यांची नियुक्ती कायम ७ डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या अधिसूचनेवर मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सही केली ज्येष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांची भाजप - सेना युती सरकारने ७ जून २०१७ रोजी राज्याच्या महाअधिवक्तापदी नियुक्ती

सोलापूर : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतरही राज्याच्या महाअधिवक्तापदी ज्येष्ठ वकील आशुतोष अरविंद कुंभकोणी यांची नियुक्ती कायम करण्यात आली आहे. यासंदर्भात ७ डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या अधिसूचनेवर मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सही केली आहे. ज्येष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांची भाजप - सेना युती सरकारने ७ जून २०१७ रोजी राज्याच्या महाअधिवक्तापदी नियुक्ती केली. या पदावर अ‍ॅड. कुंभकोणी यांना कायम करण्यात येत आहे, अशी अधिसूचना ७ डिसेंबर रोजी राज्य सरकारने काढली व त्यावर मेहता यांची सही आहे.

माजी महाअधिवक्ता रोहित देव यांची उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून २०१७ मध्ये नियुक्ती झाल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अ‍ॅड. कुंभकोणी यांची त्यांच्या जागेवर नियुक्ती केली. १२ जुलै १९५६ रोजी कुंभकोणी यांचा जन्म झाला. त्यांचे संपूर्ण कुटुंबच वकिली व्यवसायात आहे. 

२००५ पासून अ‍ॅड. कुंभकोणी यांनी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ राज्याचे सहायक महाअधिवक्ता म्हणून कामकाज सांभाळले आहे. त्यांनी राज्य सरकारच्या पॅनेलसाठीही काही वर्षे काम केले. 

१ एप्रिल २००५ पासून तीन वर्षे ते राज्याचे असोसिएट अ‍ॅडव्होकेट जनरल होते आणि अनेक कायद्यांचा मसुदा तयार करण्यात त्यांनी हातभार लावला. मुंबई विद्यापीठासह अनेक विद्यापीठे, राज्यातील महापालिका व अन्य अनेक महत्त्वाच्या संस्थांची बाजू त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयात मांडली आहे. उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्यावर काही काळाने त्यांनी राजीनामा दिला होता. ते काही वर्षे सहमहाअधिवक्ताही होते.

सोलापुरात केली १० वर्षे सेवा- अ‍ॅड. आशुतोष कुंभकोणी यांना ३५ वर्षांच्या वकिलीचा अनुभव आहे. त्यापैकी दहा वर्षे त्यांनी सोलापुरात वकिली केली. बी.एस्सी.नंतर त्यांनी वकिलीची पदवी घेतली. १९८२ मध्ये सनद घेतली. १९९२ मध्ये ते मुंबईस गेले. त्यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांत काम केले असून, न्यायालयाने ‘अ‍ॅमिकस क्युरी’ म्हणूनही त्यांची मदत घेतली आहे. त्यात शेतक ºयांच्या आत्महत्या, न्यायालयांमध्ये मूलभूत सुविधांची वानवा, पाण्याचे समान वाटप, डॉक्टरांचा संप आदी प्रकरणांत त्यांनी न्यायालयाला मोलाचे सहकार्य केले.

महाअधिवक्ता म्हणजे काय ?- राज्य सरकार आणि राज्यपाल यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी भारतीय कलम १६५ नुसार महाअधिवक्त्याचे पद निर्माण केले आहे. हा महाअधिवक्ता राज्य सरकारचा वकील म्हणून देखील काम करतात. महाअधिवक्त्याला अनेक वैधानिक स्वरुपाची कार्य पार पाडवी लागतात. त्यामुळे या पदावरील व्यक्ती राज्याचा प्रथम कायदा अधिकारी म्हणून ओळखला जातो. राज्यपाल महाअधिवक्त्याची नेमणूक करतात.

टॅग्स :SolapurसोलापूरadvocateवकिलShiv SenaशिवसेनाGovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्र