शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

नव्या चेहऱ्यांना मिळाली संधी; अनेक वर्षांत पक्षासाठी केलेल्या कामांची दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:16 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांत पक्षासाठी केलेल्या कामांची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे विस्तारातून दिसून येते.

ॲड. माणिकराव कोकाटे

- पक्ष    :    अ. पवार गट  - मतदारसंघ    :    सिन्नर (जि. नाशिक)- वय     :    ६७- शिक्षण     :    एलएल.बी.

ॲड. कोकाटे हे तब्बल पाचव्यांदा विधानसभेवर निवडून आले. त्यांनी विद्यार्थिदशेतच एनएसयूआय या काँग्रेसप्रणीत संघटनेचे नेतृत्व केले. १९९१ मध्ये जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले. जिल्हा परिषद सदस्य व सिन्नर पंचायत समितीचे सभापती होण्याचा मान मिळविला. जिल्हा परिषदेत कृषी सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली. १९९९ मध्ये राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्याविरोधात विधानसभेची निवडणूक जिंकून विधानसभेत पहिल्यांदा पाऊल ठेवले. १९९९ व २००४ची निवडणूक शिवसेनेकडून लढत विजय संपादन केला, तर २००९ मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवत हॅट्ट्रिक साधली. २०१४ च्या निवडणुकीत मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. २०१९ची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढत कमबॅक केले होते.

जयकुमार भगवानराव गोरे

- पक्ष    :    भाजप - मतदारसंघ    :    माण (जि. सातारा)- वय     :    ५०- शिक्षण     :    बी.ए. भाग २

माण मतदारसंघातून जयकुमार गोरे यांनी २००९ मध्ये विधानसभा निवडणूक जिंकली. तत्पूर्वी, २००७ मध्ये ते आंधळी जिल्हा परिषद गटाचे सदस्य व नियोजन समितीचे सदस्य हाेते. २०१४ मध्येही त्यांनी विधानसभा निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकत सर्व विरोधकांना चारीमुंड्या चीत केले. यानंतर २०१९ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार प्रभाकर घार्गे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत त्यांनी मतदारसंघावरील वर्चस्व सिद्ध केले. कार्यकर्त्यांची फौज, मतदारसंघातील जनसंपर्क या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरल्या. तत्पूर्वी, २०२२ मध्ये जयकुमार गोरे  यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून आपली छाप पाडली आहे. याचा विचार करूनच त्यांच्यासारख्या भगीरथाला पक्षाने ताकद देऊन मंत्रिपदी वर्णी लावली आहे.  

नरहरी सीताराम झिरवाळ

- पक्ष    :    अ. पवार गट - मतदारसंघ    :    दिंडेारी- वय     :    ६५ - शिक्षण     :    बी. ए. 

दिंडोरी राखीव मतदारसंघातून झिरवाळ यांनी चौथ्यांदा विधानसभेत पाऊल ठेवले. रोजंदारी बिगारीपासून विधानसभेच्या उपाध्यक्ष पदापर्यंत त्यांनी प्रवास केला. दिंडोरी तालुक्यातील वनारे या गावखेड्यात सामान्य कुटुंबात जन्मलेल्या झिरवाळ यांनी कला शाखेची पदवी संपादन करीत दिंडोरी तहसील कार्यालयात कनिष्ठ लिपिक कम शिपाई म्हणून सेवा केली. वनारे गावात ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकत सरपंचपदालाही गवसणी घातली. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पंचायत समितीचे उपसभापतिपद भूषवितानाच जिल्हा परिषदेवरही सदस्य म्हणून ते निवडून गेले. २००४ मध्ये विधानसभा लढत राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजय मिळविला. २०१४ मध्ये मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला. २०१९ मध्येही विजय सोपा केला. विधानसभेचे हंगामी अध्यक्षपद म्हणूनही काम सांभाळले.

संजय सावकारे

- पक्ष    :    भाजप - मतदारसंघ    :    भुसावळ - वय     :    ५५  - शिक्षण     :    डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर

संजय सावकारे हे यापूर्वी राज्यमंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते.  सन २००९,  २०१४ आणि  २०१९ आणि  या तीन टर्ममध्ये ते आमदार होते. आता ते भुसावळ विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आले आहेत. जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच जिल्हा दूध संघाचे ते संचालक आहेत. त्याचबरोबर विधानमंडळाच्या लोकलेखा समिती व धर्मदाय रुग्णालय तपासणी समितीचेही ते सदस्य आहेत. सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे  प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतात यांना एक मुलगा व मुलगी आहे. त्यांच्या आई या निवृत्त मुख्याध्यापिका आहेत. मोठे बंधू प्रमोद सावकारे हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांच्याकडून संजय सावकारे यांना नेहमीच   त्यांच्या कामकामात मार्गदर्शन मिळत असते. 

संजय शिरसाठ 

- पक्ष    :    शिंदेसेना- मतदारसंघ    :    औरंगाबाद पश्चिम - वय     :    ६३ - शिक्षण     :    १२वी, वाणिज्य.  रिक्षाचालक ते मंत्री असा नवनिर्वाचित मंत्री संजय शिरसाट यांचा रोमहर्षक प्रवास राहिला आहे. हलाखीच्या परिस्थितीतून ते समाजकारण व राजकारणात पुढे आले. दोन वेळेस महापालिकेत नगरसेवक आणि चार वेळेस आमदार राहिलेले शिरसाट तीन दशकांपासून शिवसेनेत कार्यरत आहेत. महापालिकेत सभागृह नेता, स्थायी समिती सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले. २००९ मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात शिरसाट यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. मागील अडीच वर्षांपासून त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिल्याने ते नाराज होते. मात्र, तरीही शिरसाट यांनी शिंदेसेनेच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी सांभाळून विरोधकांना जशास तसे उत्तर दिले. त्यामुळे त्यांना यावेळी मंत्रिपदाची बक्षिसी मिळाल्याचे बोलले जात आहे. त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. 

प्रताप बाबूराव सरनाईक

- पक्ष    :    शिंदेसेना - मतदारसंघ    :    ओवळा माजिवडा (ठाणे)- वय     :    ६१ - शिक्षण     :    दहावी 

सध्या शिंदेसेनेचे प्रवक्ते असलेले प्रताप सरनाईक हे ओवळा- माजिवडा मतदारसंघातून सलग चाैथ्यांदा निवडून आले आहेत. १९९५ पासून विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. २००९ मध्ये पहिल्यांदा ओवळा- माजिवडा मतदारसंघातून  विधानसभेवर त्यांची निवड झाली. त्यानंतर २०१४, २०१९ आणि आता २०२४ असे सलग चार वेळा ते निवडून आले. २०१४ मध्ये शिवसेना पक्षाच्या मीरा-भाईंदर संपर्कप्रमुखपदी त्यांची निवड झाली होती.  काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असा राजकीय प्रवास असलेल्या सरनाईक यांनी यापूर्वी  ठाणे महापालिकेत तीन वेळा नगरसेवक, म्हाडा आणि एमएमआरडीए सदस्य अशी पदे भूषविली आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांच्या साथीला जे आमदार गेले, त्यामध्ये प्रताप सरनाईक यांचादेखील समावेश होता. 

भरत गोगावले

- पक्ष    :    शिंदेसेना - मतदारसंघ    :    महाड (जि. राजगड)- वय     :    ६१- शिक्षण     :    ८ वी पास

भरत गोगावले यांनी २००९ साली जिल्हा परिषदेत बिरवाडी गटातून  सदस्य म्हणून निवडून येत आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यानंतर ते थांबले नाहीत. पुढे त्यांनी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापतिपदही भूषवले. मतदारसंघातील जनतेशी जवळीक ठेवल्याने त्यांचा राजकीय प्रवास थांबला नाही. शिवसेनेकडून २००९, २०१४ आणि २०१९ सलग तीन वेळा निवडून आले. २०२४च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उद्धवसेनेच्या स्नेहल जगताप यांचा पराभव करून ते निवडून आले. सलग चारवेळा आमदार होण्याचा मान गोगावले यांनी या मतदार संघातून पटकावला आहे. महाडच्या विकासात त्यांचा मोलाचा सहभाग आहे. स्थानिक समस्यांची जाण याशिवाय मतदारसंघातील लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक यामुळे त्यांना मतदारांनी २०२४ मध्येही संधी दिली. 

मकरंद जाधव-पाटील

- पक्ष    :    अ. पवार गट - मतदारसंघ    :    वाई (जि. सातारा)- वय     :    ५९ - शिक्षण     :    सिव्हिल इंजिनिअर (डिप्लोमा)

मकरंद जाधव-पाटील यांचा राजकीय प्रवास प्रेरणादायी आहे. अगदी वाई तालुक्यातील बोपेगावच्या सरपंचपदापासून २००० मध्ये  पाटील यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यानंतर तब्बल दोन तपानंतर त्यांनी अखेर मंत्रिपदी मजल मारली आहे. त्यांनी २००४ मध्येही विधानसभा निवडणूक  राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढविली होती. मात्र, बंडखोरी झाल्याने त्यांचा पराभव झाला. २००९ मध्ये अपक्ष म्हणून ते निवडून गेले. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकाही जिंकल्या. जिल्हा बँकेच्या संचालकपदी ते २०१९ मध्ये निवडून आले. अडीच वर्षांपूर्वी महायुतीचे सरकार आले. यानंतर मकरंद पाटील यांनी अजित पवार यांना साथ दिली. २०२४ च्या विधानसभेलाही राष्ट्रवादीमधून प्रचंड मताधिक्य घेऊन चौथ्यांदा निवडून गेले आहेत. 

नितेश नारायण राणे 

- पक्ष    :    भाजप - मतदारसंघ    :    कणकवली - वय     :    ४२ - शिक्षण     :    एमबीए

स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून राजकारणात आलेल्या आमदार नितेश राणे यांनी २०१४मध्ये विधानसभेच्या कणकवली मतदारसंघातून काँग्रेसकडून आमदार म्हणून विधानसभेत एन्ट्री केली होती. त्यानंतर विविध सामाजिक उपक्रम राबवित प्रसंगी जनसामान्यांसाठी रस्त्यावरील लढाई लढली होती. २०१९ मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून दुसऱ्यांदा ते आमदार झाले. हिंदुत्त्वाचा झेंडा खांद्यावर घेऊन नितेश राणे यांनी गेली दोन वर्षे संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख आहे. हिंदुत्त्वाचा नारा देत संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत आपली वेगळी छाप उमटवली आहे. वडील नारायण राणे यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात आलेले नितेश राणे हे आक्रमक हिंदुत्ववादी नेते म्हणून या निवडणुकीत पुढे आले. 

आकाश फुंडकर 

- पक्ष    :    भाजप- मतदारसंघ    :    खामगाव- वय     :    ४१ - शिक्षण     :    बी.काॅम. एलएलबी

आकाश फुंडकर हे माजी कृषी मंत्री, खासदार भाऊसाहेब उर्फ पांडुरंग फुंडकर यांचे ते सुपूत्र आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून व्दितीय वर्ष शिक्षीत आहेत. २००३ ते २००५ या काळात ते भाजप विद्यार्थी आघाडीमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.  भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष, भाजप बुलढाणा जिल्हाध्यक्ष (मार्च २०२० ते२०२२) अशी पदेही त्यांनी भुषविली आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून २०१४ मध्ये पहिल्यांदा ते निवडूण आले. त्यानंतर २४ ऑक्टोंबर २०१९ रोजी दुसऱ्यांदा ते आमदार झाले तर, २३ ऑक्टोबर २०२४ रोजी आमदार म्हणून तिसऱ्यांदा त्यांची निवड झाली. आजीवन सदस्य, बॉम्बे आर्ट सोसायटी, मुंबई,  सार्वजनिक उपक्रम मंडळ समिती सदस्य, रोजगार हमी योजना समिती सदस्य, २०१९ मध्ये भाजपाच्या विधिमंडळ प्रतोदपदी नियुक्ती. आदी पदांवर ते आहेत. 

बाबासाहेब पाटील

- पक्ष    :    अ. पवार गट- मतदारसंघ    :    अहमदपूर - वय     :    ६५ - शिक्षण     :    बीए

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात सक्रिय राहून त्यांनी आता कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत मजल मारली आहे. १९८५ मध्ये शिरूर ताजबंद येथील विविध कार्यकारी सोसायटीत बिनविरोध म्हणून त्यांच्या राजकारणाला प्रारंभ झाला. सहकार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते विजयी झाले. जिल्हा बँकेचे पाच वेळा संचालक राहिले. जिल्हा बँकेचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले. जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून १५ वर्षे त्यांनी कामगिरी केली. १९९२ ते १९९७ या पाच वर्षांच्या कालावधीत  लातूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली असून, २००९ ते २०१४ आणि २०१९ ते २०२४ या काळात त्यांनी अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. समाजसेवा, आधुनिक शेती, वाचन आणि खेळाचा छंद असलेले बाबासाहेब पाटील यांना कोणते खाते मिळेल याची कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे.

प्रकाश आनंदराव आबिटकर

- पक्ष    :    शिंदेसेना - मतदारसंघ    :    राधानगरी-भुदरगड- वय     :    ५२ - शिक्षण     :    बी. ए.

साखर कारखान्याचे अध्यक्ष असलेल्या माजी आमदार के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील कारखान्यात कामगार म्हणून ज्यांनी काम केले त्याच आनंदराव आबिटकर यांचा मुलगा प्रकाश महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समाविष्ट होणे, ही एक अनोखी बाब आहे. वयाच्या २१व्या वर्षी ते पंचायत समितीचे अपक्ष सदस्य, उपसभापती झाले.  २००२ मध्ये जिल्हा परिषद सदस्य बनले.  राधानगरी-भुदरगड मतदारसंघातून २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये विजयी झाले. ‘लोकमत’तर्फे विधानसभेतील ‘उत्कृष्ट अभ्यासू वक्ता’, एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे ‘आदर्श युवा आमदार’, ‘उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार’ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देण्यात आला. सामूहिक प्रश्नांची मांडणी करून ते सोडविण्यासाठी अखंड पाठपुरावा हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या घरातून आल्याने त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.

माधुरी मिसाळ

- पक्ष    :    भाजप- मतदारसंघ    :    पर्वती - वय     :    ६० - शिक्षण     :    बी.कॉम. 

माधुरी मिसाळ या सलग चौथ्यांदा आमदार होणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव महिला ठरल्या आहेत. भाजपमध्ये १८ वर्षांपासून त्या कार्यरत असून, नगरसेविका ते मंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे. २००७ मध्ये पहिल्यांदा कसब्यातून नगरसेविका म्हणून त्या निवडून आल्या.  स्वातंत्र्यसेनानी केशवराव देशपांडे यांची नात. पती कै. सतीश मिसाळ यांच्यानंतर समाजसेवेचा वसा त्यांनी कायम ठेवला. १९८९ पासून संचालक आणि अध्यक्ष म्हणून बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. २२ वर्षांपासून पायाभूत सुविधा, विकास आणि बांधकाम क्षेत्रात त्या काम करत आहेत. संघटनात्मक पातळीवर अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. पुणे शहरातील आतापर्यंत अनेक महिला आमदार झाल्या आहेत; पण महिला आमदारांची मंत्रिपदी आतापर्यंत कधीच वर्णी लागली नव्हती. मिसाळ पहिल्या मंत्री आहेत. 

ॲड. आशिष जयस्वाल

- पक्ष    :    शिंदेसेना - मतदारसंघ    :    रामटेक (जि. नागपूर) - वय     :    ५४- शिक्षण     :    एल. एल. बी.

शिवसेना उपजिल्हा प्रमुख म्हणून आशिष जयस्वाल यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ते जिल्हा परिषद सदस्य होते. मागील २८ वर्षांपासून शिवसेना पक्षात निष्ठेने कार्य करून विविध आंदोलने, मेळावे घेऊन पक्ष संघटनेला जिल्ह्यात उल्लेखनीय यश प्राप्त करून दिले. नोव्हेंबर २०२४ मध्ये रामटेक विधानसभा मतदारसंघातून विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले. पहिल्यांदा २००४-२००९ विधानसभा सदस्य बनले. त्यानंतर २००९-२०१४, २०१४-२०१९ आणि आता २०२४-२०२९ विधानसभा सदस्य. विधिमंडळात पक्षाचे प्रतोद होते. सभागृहात पूर्णवेळ उपस्थित राहून प्रत्येक चर्चेत सहभाग घेतला. पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये सिंचन व्यवस्थापन व लाभक्षेत्र विकासात सक्रिय सहभाग. पेंच प्रकल्पातील लाभक्षेत्रात विविध कालवे, वितरीकांचे, नुतनीकरणासाठी नियमित पाठपुरावा केला.

डॉ. पंकज राजेश भोयर

- पक्ष    :    भाजप- मतदारसंघ    :    वर्धा- वय     :    ४७- शिक्षण     :    एम.ए., पी.एच.डी.

वर्धा विधानसभा मतदारसंघातून सतत तिसऱ्यांदा विजय संपादन केला. डॉ. पंकज भोयर यांनी अर्थशास्त्रात एमएचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर डॉक्टरेटही मिळविली. त्यांचा जन्म ५ जानेवारी १९७७ रोजी झाला. गेल्या दहा वर्षा मतदारसंघात कोट्यवधींची विकास कामे खेचून आणली. युवक काँग्रेसमधून राजकीय जीवनाची सुरुवात केली. तत्पूर्वी १९९९ मध्ये राजकीय क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला होता. २००२ मध्ये युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले. नंतर २००५ मध्ये दांडी मार्चमध्ये, तर २००६ मध्ये प्रेरणा यात्रेत ते सहभागी झाले होते. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर ते भाजपमध्ये दाखल झाले. लगेच त्यांना भाजपने वर्धा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी बहाल केली. पहिल्याच प्रयत्नात ते निवडून आले आणि आमदार झाले. तेव्हापासून सतत तीनदा आमदार म्हणून विजयी झाले.

मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर

- पक्ष    :    भाजप - मतदारसंघ    :    जिंतूर (जि.परभणी) - वय     :    ४४ - शिक्षण     :    बीएस्सी, एमए  

मेघना बोर्डीकर या २०१९ व २०२४ असे सलग दोनदा परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघातून भाजपकडून निवडून आल्या आहेत. भाजपने त्यांना यावेळी मंत्रिपदाची संधी दिली. २०१२ मध्ये परभणी जिल्हा परिषदेच्या सदस्या म्हणून त्यांनी राजकीय जीवनात पाऊल ठेवले. पुढे विविध पदांवर प्रभावीपणे काम करत त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली. सध्या त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालकही आहेत. पदव्युत्तर पदविधारक असलेल्या मेघना बोर्डीकर यांचा जन्म १० एप्रिल, १९८० चा असून जिंतूर तालुक्यातील बोर्डीच्या आहेत. आमदार असताना इतर विकासकामांसोबतच मृद आणि जलसंधारणासाठी विशेष प्रयत्न, महिला - युवकांसाठी रोजगार कार्यक्रम, व्यसनमुक्ती व पुनर्वसन कार्यक्रम राबविण्यावर भर दिला. वडील रामप्रसाद बोर्डीकर चारदा आमदार व मुंबई बाजार समितीचे सभापती राहिले आहेत. 

इंद्रनील मनोहरराव नाईक 

- पक्ष    :    अजित पवार गट - मतदारसंघ    :    पुसद जि. यवतमाळ- वय     :    ४२- शिक्षण     :    बी.एस.एल, एलएल.बी. 

मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या घराण्यातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधीत्व इंद्रनील नाईक करीत आहे. त्यांनी सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून प्रतिनिधीत्व केले आहे. २००४ पासून ते वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान मुंबई येथे कार्यरत आहे. शेती हा त्यांचा आवडीचा विषय आहे. यासोबतच प्रवास करणे हे त्यांना आवडते. त्यांनी अमेरिका, युके, सिंगापूर, युएई, माॅरिशस, इंडोनिशिया, थायलंड, हाॅंगकाॅंग, श्रीलंका या देशांचा अभ्यास दौरासुद्धा केला आहे. नाईक घराण्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी रविवारी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. गळ्यात मंत्रिपदाची माळ पडल्याने मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. उच्चशिक्षीत, अभ्यासू आणि कृषी क्षेत्राची जाण असलेला मंत्री मिळाल्याने मतदारसंघासह यवतमाळ जिल्ह्याच्या अपेक्षा उंचावल्या. त्यांना कोणते खाते मिळेल याकडे लक्ष आहे.  

योगेश रामदास कदम

- पक्ष    :    शिंदेसेना- मतदारसंघ    :    दापोली- वय     :    ३८  - शिक्षण     :    बी. कॉम.

योगेश रामदास कदम हे २०१५ पासून ते राज्यातील युवक चळवळीत सक्रिय सहभागी  आहेत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार व क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांत ते कार्यरत असून, रामदास कदम यांनी स्थापन केलेल्या शिवतेज आरोग्य संस्थेसह अनेक संस्थांचा कारभार ते पुढे नेत आहेत. २०१९ मध्ये शिवसेनेचे योगेश कदम प्रथम आमदार झाले. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी मतदारसंघात असंख्य कामेही केली आणि आपला संपर्कही वाढवला. म्हणूनच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला टक्कर देत ते मोठ्या फरकाने विजयी झाले. काहीसा शांत स्वभाव असल्याने त्यांनी संपर्काचे जाळे अधिक विणले गेले आहे. हेच त्यांचे बलस्थान आहे. अगदी वयाच्या ३८ व्या वर्षी कदम यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारMahayutiमहायुतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसState Governmentराज्य सरकार