शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

समान हक्काच्या नव्या युगाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 6:34 AM

बलात्कार झाल्यावर लपविणे आणि गुन्हा दाखल न करणे हे काही वर्षांपूर्वी फार सामान्य होते, पण सध्या ही मानसिकता बदलते आहे. फक्त पीडितच नव्हे, तर तिचे कुटुंबीयही तिच्यामागे भक्कमपणे उभे राहत असल्याचे जाणवू लागले आहे. इतक्या वर्षांच्या मुस्कटदाबीनंतरचे हे आशेचे कवडसे नक्कीच उमेदीचे आहेत.

- शुभा प्रभू साटमग्रामीण भागातील मुली-तरुणींचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.पोलीस, लष्कर अशा ठिकाणी नोकरीचा प्रयत्न करणा-या व प्रसंगी त्यासाठी सुरक्षित कवच सोडून शहरात किंवा तालुका, जिल्हा ठिकाणी राहणाºया ग्रामीण मुलींच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. पोरगी न्हातीधुती झाली की, तिला उजवून टाकणे हा एकमेव अजेंडा असण्याच्या विचारधारेपासून येथपर्यंत झालेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे. नव्या वर्षाच्या कॅलेंडरमध्ये पाहिले जाते ते भविष्य... काय घडणार पुढील वर्षात?तर २०१८ हे वर्ष कसे असेल? सर्वात महत्त्वाचे हे की, संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या हाडिया उर्फ अखिला हिच्या विवाहासंदर्भातला निर्णय या वर्षी सांगितला जाईल. आधीची हिंदू असलेल्या अखिलाचे मतपरिवर्तन करून, तिला जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारायला लावला गेल्याचा दावा हाडियाच्या वडिलांनी दाखल केला आहे. अखिला हाडिया वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणारी कायद्याने सज्ञान असलेली सुशिक्षित मुलगी आहे. तिला विवाह, धर्म, शिक्षण यांची निवड करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य भारताची घटना देते, पण परंपरागत पुरुषी मनोवृत्ती आणि धर्म भावनेने आंधळे झालेल्यांना हे उमगणार नाही. तर हाडियाच्या विवाहाबद्दलचा निर्णयफे ब्रुवारीमध्ये सुनावण्यात येईल. या घटनेवरून एक लक्षात येते की, फक्त वर्ष बदलले... विचार नाहीत किंवा रूढी नाहीत... वरील घटना ही त्या दृष्टीने महत्त्वाची ठरावी.पुढील वर्षी #मीट किंवा #ेी ३ङ्मङ्म. ही चळवळ आणखी फोफावेल. व्यवसाय किंवा नोकरीच्या ठिकाणी होणाºया सुप्त लैंगिक छळाविरुद्धचा हा लढा खरे तर २००६ तच सुरू झाला. या वर्षाअखेरीस त्याला अधिक जागतिक रूप आले. मुख्य म्हणजे, भारतात अनेक जणी या हॅशटॅगमधून व्यक्त होऊ लागल्या. इथे अशा गुन्ह्याबाबतची बळी असूनही बाईला हेतुपुरस्सर दिली जाणारी अपराधीपणाची भावना किंवा याला तीच जबाबदार हे मानणे आता हळूहळू बंद होत आहे.वर्ष संपल्यावर उपक्रम संपले असे न होता, नव्या वर्षात हे उपक्रम अधिक जोराने बहुव्यापी होतील, हा विश्वास आहे. राइट टू पी ही चळवळ अधिक यशस्वी होईल. याचे श्रेय प्रामुख्याने सोशल मीडियालाच जाते हे निर्विवाद. अर्थात, वर उल्लेख केलेल्या दोन गोष्टी पूर्णपणे शहरी अथवा नागर विभागकेंद्री आहेत. थोडक्यात, आशेला जागा नक्कीच आहे. लिंगसापेक्ष समान हक्काच्या नव्या युगाकडे २०१८ हे वर्ष अधिक उमेदीने नेवो, ही इच्छा.(लेखिका स्त्रीमुक्ती चळवळीत कार्यरत आहेत.) 

टॅग्स :Womenमहिला