शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचा सवाई गंधर्व महोत्सव अडचणीत : न्यू इंग्लिश शाळेने नाकारली जागा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 18:30 IST

गेली ६५ वर्ष पुण्यासह जगभरातल्या कानसेनांच्या हृदयावर कोरलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजकांवर जागा शोधत फिरण्याची वेळ आली आहे.

पुणे : गेली ६५ वर्ष पुण्यासह जगभरातल्या कानसेनांच्या हृदयावर कोरलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजकांवर जागा शोधत फिरण्याची वेळ आली आहे. गेली अनेक वर्ष न्यू इंग्लिश स्कुल, रमणबागमध्ये भरणाऱ्या महोत्सवाला यंदा शाळेने जागा देण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे आयोजकांसमोर पेच निर्माण झाला आहे. 

           यंदाचे महोत्सवाचे ६६वे वर्ष आहे. सर्वसाधारणपणे डिसेंबर महिन्याच्या मध्यात सवाई महोत्सव अनुभवायला मिळतो. अनेक जण तारखा जाहीर झाल्यावर खास सुट्टी काढून सवाईमध्ये हजेरी लावतात. सवाईमध्ये कला सादर करणे अत्यंत मानाचे समजले जात असल्यामुळे कलाकारांचे लक्षही सवईकडे लागलेले असते. यावर्षी मात्र महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या आर्य संगीत प्रसारक मंडळासमोर जागेचा प्रश्न आहे. 

           याबाबत अधिक माहिती अशी की, गेली तीस वर्ष न्यू इंग्लिश स्कुलच्या मैदानावर महोत्सव पार पडतो.यावर्षीदेखील आयोजकांतर्फे शाळेला पत्र पाठवण्यात आले. त्यावर शाळेने साधारण त्याच काळात शालेय क्रीडा प्रशिक्षण वर्ग असल्यामुळे जागा देण्यास नकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याबाबत आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितले की, या ठिकाणाची आता पुणेकरांना सवय झाली आहे. त्यामुळे शाळेसोबत पुन्हा संपर्क करण्यात येईल. मात्र त्यालाही यश आले नाही तर इतर पर्यायांचाही विचार सुरु आहे. 

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिक