शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा! कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटच्या म्युटेशननं वाढवली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 10:09 IST

CoronaVirus News: महाराष्टाची चिंता वाढली; नव्या व्हेरिएंटमुळे धाकधूक

मुंबई/भोपाळ: देशातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. मात्र महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. दोन्ही राज्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट (AY.4.2) आढळून आला आहे. 

मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये नव्या व्हेरिएंटचे ७ रुग्ण आढळून आल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. नॅशनल सेंटर ऑफ डिजीज कंट्रोलच्या जिनॉम सिक्वन्सिंग अहवालातून ही माहिती समोर आली आहे. नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्या सात जणांपैकी दोन जण लष्कराचे अधिकारी असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. सैत्या यांनी दिली. यासोबतच महाराष्ट्रातील एक टक्का नमुन्यांमध्ये हा व्हेरिएंट आढळून आला आहे.

डेल्टा AY.4.2. म्युटेशनवर संशोधन सुरू असल्याची माहिती ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा यंत्रणेनं २० ऑक्टोबरला दिली आहे. या व्हेरिएंटच्या प्रसाराचा वेग अधिक आहे. त्यामुळे त्याला VUI-21OCT-01 असं शास्त्रीय नाव देण्यात आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून या व्हेरिएंटनं ब्रिटनमध्ये धुमाकूळ घातला आहे. डेल्टाच्या तुलनेत या व्हेरिएंटच्या प्रादुर्भावाचा वेग जास्त आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या