शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

‘अडीच तास अगोदर’च्या नियमाचा नेट परीक्षार्थींना मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 05:55 IST

सहायक प्राध्यापक पदांसाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या पात्रता परीक्षेला (नेट) वेळेपूर्वी अडीच तास परीक्षा केंद्रात हजर राहण्याची सक्ती सीबीएसईकडून करण्यात आली.

पुणे - सहायक प्राध्यापक पदांसाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या पात्रता परीक्षेला (नेट) वेळेपूर्वी अडीच तास परीक्षा केंद्रात हजर राहण्याची सक्ती सीबीएसईकडून करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात त्या वेळेत परीक्षा केंद्राचे दरवाजे उघडलेले नसणे, शिक्षकच आलेले नसणे आदी मनस्ताप देणारे अनुभव रविवारी विद्यार्थ्यांना आले.परीक्षेच्या काही तास अगोदर प्रश्नपत्रिका फोडण्याचे प्रकार परीक्षा केंद्रात घडल्याचे उजेडात आले होते. त्याला अटकाव करण्यासाठी सीबीएसईकडून कडक नियमावली तयार केली आहे. त्यामध्ये परीक्षा सुरू होण्यापूर्वी अडीच तास अगोदर परीक्षा केंद्रात परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांनी हजर रहावे असे आदेश सीबीएसईकडून काढण्यात आले आहे. नेटचा पहिला पेपर साडे नऊला सुरू होणार असताना प्रत्यक्षात ७ वाजताच परीक्षा केंद्रात हजर राहण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या.मात्र अनेक परीक्षा केंद्रांचे दरवाजे आठ नंतर उघडण्यात आले, तर अनेक ठिकाणी परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेले शिक्षकच आठनंतर आले. या परीक्षेसाठी उमेदवारांना परीक्षा खोलीत घड्याळ नेण्यासही बंदी घातली आहे. त्याचबरोबर स्वेटर, जर्किन्स, बॅग, मोबाइल बाहेर काढून ठेवण्यास सांगण्यात आले. यामुळे विद्यार्थी अधिकच त्रस्त झाले आहेत़ पालकांनाही याने अधिक मनस्ताप झाला आहे़पहिला पेपर अवघडयंदाच्या नेट परीक्षेतील पहिला पेपरची काठिण्यपातळी अधिक ठेवली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पहिला पेपर सोडविण्यासाठी वेळच पुरला नाही. या पेपरमधील प्रश्न किचकट असल्याने ते सोडविण्यासाठी अधिक वेळ लागत होता, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.तीनऐवजी दोनच पेपरयंदाच्या नेट परीक्षेपासून परीक्षा पद्धतीमध्ये बदल केले होते. तीनऐवजी दोन पेपर घेण्यात आले. नेट परीक्षा पद्धतीमध्ये केलेल्या बदलाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले.

टॅग्स :examपरीक्षाnewsबातम्या