मुंबई : काळबादेवीमधल्या गोकूळ हाऊस इमारतीची आग विझविताना वीरमरण आलेले अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील नेसरीकर यांच्या कुटुंबीयांना महापालिकेने अंधेरीमधील अग्निशमन दलाच्या वसाहतीतील राहते घर रिकामे करण्याची नोटीस दिली आहे. परिणामी या प्रकाराचा कुटुंबीयांसह लोकप्रतिनिधींनी निषेध व्यक्त केला असून, पुढील किमान तीन वर्षे नेसरीकरांच्या कुटुंबीयांना घर रिकामे करण्यास लावू नये, असे म्हटले आहे.नेसरीकर यांचे २४ मे रोजी ऐरोलीतील नॅशनल बर्न सेंटरमध्ये निधन झाले. त्यांच्या निधनाला काही दिवसांचा कालावधी उलटत नाही तोच महापालिकेने नोटीस दिल्याचे नेसरीकर कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी आणि काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी सांगितले. नेसरीकर यांचे कुटुंबीय अंधेरी येथील इर्ला अग्निशमन दलाच्या वसाहतीमधील घरात वास्तव्य करीत आहेत. शिवाय नेसरीकर यांच्या मुलगा सिद्धांत हा अंधेरी येथील एनएम महाविद्यालयच्या अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला आहे. (प्रतिनिधी)
नेसरीकर कुटुंबीयांना घर खाली करण्याची नोटीस
By admin | Updated: June 4, 2015 04:42 IST