शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

निपाह विषाणूचा राज्याला धोका नाही; आरोग्य विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 02:37 IST

प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू, केरळमध्ये आढळला रुग्ण

मुंबई : गेल्या वर्षी केरळमध्ये निपाह विषाणूने थैमान घातल्यानंतर यंदा पुन्हा निपाहचा पहिला रुग्ण तेथे आढळला आहे. निपाह विषाणूचा धसका संपूर्ण देशानेच घेतला असून या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने राज्यभरात त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आली असून सध्या तरी या विषाणूचा कोणताही धोका महाराष्ट्राला नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, रुग्णालये, डॉक्टर तसेच परिचारिका यांनी या आजारासंदर्भात घ्यावयाची काळजी आणि करायच्या उपाययोजना यासंदर्भातील मार्गदर्शिका राज्यातील सर्व रुग्णालयांना पाठविण्यात येत आहे. निपाह विषाणू आजारात विशेषत: ताप, मेंदूज्वर, अंगदुखी, डोकेदुखी, झोप येणे, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे आढळतात. हा विषाणू मुख्यत्वे केरळ, ईशान्य भारत, बांगलादेश, पश्चिम बंगाल या ठिकाणांवरून पसरत असल्याने तेथून आलेल्या नागरिकांमध्ये या विषाणूची लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या विषाणूसाठी कुठलीही लस नसल्याने खबरदारी घेण्यात येत आहे. अशा रुग्णांनी तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल व्हावे. सरकारी रुग्णालयात यासाठी सुरू असलेल्या विलगीकरण कक्षात या रुग्णांना दाखल करण्यात यावे, असे आवाहन डॉ. आवअ‍े यांनी केले. राज्यात या रोगासंदर्भात एकही रुग्ण आढळलेला नाही. पण तरीही खबरदारीच्या उपाययोजना म्हणून राज्यातील सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालये, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक यांना सूचित करण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली. नागरिकांनीही खबरदारीचा उपाय म्हणून या विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या केरळमधील कोझीकोडे व इतर परिसरातील प्रवास टाळावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

असा होतो या विषाणूचा प्रसारनिपाह विषाणूचा प्रसार हा मुख्यत्वे फळांवर जगणाऱ्या वटवाघळांमार्फत होतो. वटवाघळांनी अर्धवट खाल्लेली फळे हाताळल्याने अथवा खाल्ल्याने हा आजार होतो. डुक्कर आणि इतर पाळीव प्राणी यांनाही बाधा होऊ शकते. १९९८ च्या मलेशियातील उद्रेकात वराह पालन करणारे शेतकरी मुख्यत्वे बाधित झाले होते. निपाह विषाणूची लागण माणसापासून माणसास होऊ शकते. रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय कर्मचारी, रुग्णसेवा करणारे नातेवाईक यांना लागण होऊ शकते. वटवाघळाच्या स्रावामुळे दूषित झालेला खजुराच्या झाडाचा रस घेतल्यानेदेखील या विषाणूचा प्रसार होतो.

निपाह हा विषाणू मुख्यत्वे केरळ, ईशान्य भारत, बांगलादेश, पश्चिम बंगाल या ठिकाणांवरून पसरत असल्याने उघडकीस आले आहे.

लक्षणे व उपचारनिपाह विषाणू आजारात ताप, अंगदुखी, डोकेदुखी, झोप येणे, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे आढळतात. या आजारावर कोणतेही विशिष्ट औषध नाही. रॅबाविरिन हे विषाणूविरोधी औषध वापरले जात असले तरी मुख्यत्वे लक्षणाधारित उपचार आणि साह्यभूत शुश्रूषा यावर भर दिला जातो.

टॅग्स :Healthआरोग्य