शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

नीट परीक्षा : विद्यार्थ्यांच्या कॉलर, बाह्या कापल्या, राज्यभर गोंधळात गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 04:07 IST

नीट परीक्षेसाठी निश्चित करण्यात आलेल्या ड्रेस कोडचा फटका काही विद्यार्थ्यांना बसला. काही केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या शर्टची कॉलर, बाह्या कापण्यात आल्या. एका केंद्रावर विद्यार्थ्याचा शर्ट काढून बनियनवरच परीक्षा देण्यास सांगून अपमानित करण्यात आले.

पुणे : नीट परीक्षेसाठी निश्चित करण्यात आलेल्या ड्रेस कोडचा फटका काही विद्यार्थ्यांना बसला. काही केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या शर्टची कॉलर, बाह्या कापण्यात आल्या. एका केंद्रावर विद्यार्थ्याचा शर्ट काढून बनियनवरच परीक्षा देण्यास सांगून अपमानित करण्यात आले.सोलापूर येथून पुण्यातील परीक्षा केंद्रावर येण्यास केवळ तीन मिनिटे उशीर झाला म्हणून एकाला परीक्षेला मुकावे लागले. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेसाठी कडक नियमावली केली होती. ड्रेस कोडसह केंद्रात पेन, घड्याळ, पाण्याची बाटली तसेच इतर साहित्य केंद्रात घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली होती. वेळेच्या बाबतीतची काटेकोर सूचना देण्यात आल्या होत्या. पण अनेक विद्यार्थ्यांनी ड्रेस कोड तसेच वेळ पाळली नाही. परीक्षा सुरू होण्याची वेळ सकाळी १० असली तरी विद्यार्थ्यांना सकाळी ७.३० ते ८.३० आणि ८.३० ते ९.३० असे दोन गटात विभागण्यात आले होते. त्यांच्या प्रवेश पत्रावरही तसे नमुद केले आहे.परीक्षा केंद्रावर पोहचण्यास केवळ तीन मिनिटे उशीर झाला तरी केंद्रात प्रवेश दिला नाही, असा दावा सोलापूर येथून पहिल्यांदाच पुण्यात आलेल्या माऊली कारंडे या विद्यार्थ्याने केला आहे. त्याच्यासह अन्य काही केंद्रांवरही विद्यार्थी ९.३० नंतर आल्याने त्यांना परीक्षेस बसण्यास मज्जाव करण्यात आला. ड्रेस कोडमध्ये कॉलर, फुल बाह्याचा शर्ट घालू नये, असे म्हटले होते. औंध येथील केंद्रावर विद्यार्थ्याचा बटन असलेला शर्ट काढून बनियनवरच परीक्षा देण्यास सांगण्यात आले. त्याचे बनियनवरील छायाचित्रही काढण्यात आले. त्यामुळे तो परीक्षेपूर्वीच निराश झाला होता. तेथील एकाने जवळील दुसरा टी-शर्ट त्याला दिला. या केंद्रावर फुल बाह्याचा शर्ट घालून आलेल्या एका विद्यार्थ्याच्या शर्टच्या बाह्या कापण्यात आल्याचे या केंद्रातील विद्यार्थ्याने सांगितले. पिंपळे सौदागर येथील परीक्षा केंद्रांवर आलेल्या काही विद्यार्थ्यांची कॉलर कापून त्यांना केंद्रात प्रवेश देण्यात आला. बहुतेक केंद्रांवर मंडळाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यात आले.पाण्याची अपुरी सुविधाकाही परीक्षा केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची चांगली सुविधा नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. बाणेर येथील केंद्रावर एकच पाण्याची बाटली आणि एकाच ग्लासाद्वारे वर्गात सर्वांना पाणी दिले जात होते.

टॅग्स :examपरीक्षाMaharashtraमहाराष्ट्र