शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"मंत्री तुम्ही तुमच्या घरी, इथं...", निलम गोऱ्हेंनी भर सभागृहात गुलाबराव पाटील यांना सुनावलं!; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 14:02 IST

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. दोन्ही सभागृहात विरोधक आणि मंत्री यांच्यात वाकयुद्ध रंगताना पाहायला मिळत आहे.

मुंबई-

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. दोन्ही सभागृहात विरोधक आणि मंत्री यांच्यात वाकयुद्ध रंगताना पाहायला मिळत आहे. विधान परिषदेत आज मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर उपसभापती निलम गोऱ्हे चांगल्याच संतापलेल्या पाहायला मिळाल्या. "मंत्री तुम्ही तुमच्या घरी", अशा शब्दांत निलम गोऱ्हे यांनी भर सभागृहात गुलाबराव पाटील यांना सुनावलं आहे. तसंच सभागृहात बोलण्याच्या आक्रमक पद्धतीवरुनही त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना ताकीद दिली. 

पांढरी दाढी देशात, काळी दाढी राज्यात अन् भाषणावर GST; छगन भुजबळांची विधानसभेत तुफान बॅटिंग!

शिक्षकांच्या बाबतीत निर्णय झालेला असतानाही त्याबाबतचा निधी थांबवल्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्या जुंपली. त्यावेळी गुलाबराव पाटील यांनी ज्या प्रकारे सभागृहात भाषण केलं, त्यावर नीलम गोऱ्हे यांनी आक्षेप नोंदवला. निलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटील यांना खाली बसण्यासाठी वारंवार निर्देश दिले तरी ते खाली बसले नाहीत. छातीवर हात बडवून काय बोलता?, अशा शब्दांत निलम गोऱ्हे यांनी गुलाबरावांना सुनावलं

नेमकं काय घडलं?शिक्षकांच्या बाबतीतील एका प्रश्नावरुन गदारोळ सुरू असताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गदारोळादरम्यान मंत्री गुलाबराव यांना वारंवार खाली बसण्याची विनंती करत होत्या. "गुलाबराव पाटील मी तुम्हाला वारंवार विनंती केली, ताकीद दिली, आधी खाली बसा ताबडतोब. सभागृहात वागायची ही कुठली पद्धत आहे. संसदीय कार्यमंत्री आपण यांना समज देऊ शकत नाही का? परत परत सभापतींना सांगावं लागतंय. चौकात आहात का तुम्ही?", असं निलम गोऱ्हे म्हणाल्या. यावर गुलाबराव पाटील यांनी "मी मंत्री आहे", असं म्हटलं. यावरुन निलम गोऱ्हे आणखी संतापल्या आणि "मंत्री काय? मंत्री तुम्ही घरी, आधी खाली बसा. हे सभागृह आहे हे लक्षात घ्या. शांत राहा", असं सुनावलं. 

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेGulabrao Patilगुलाबराव पाटील