कीर्तनातून नदी स्वच्छतेबाबत प्रबोधन करणे गरजेचे - लोणीकर

By admin | Published: May 13, 2016 07:50 PM2016-05-13T19:50:55+5:302016-05-13T19:50:55+5:30

चंद्रभागा नदीचे पावित्र्य राखण्यासाठी शासनाने नमामी चंद्रभागा हा कार्यक्रम हाती घेतला आहे

Need to improve the cleanliness of river Kirtana - Lonikar | कीर्तनातून नदी स्वच्छतेबाबत प्रबोधन करणे गरजेचे - लोणीकर

कीर्तनातून नदी स्वच्छतेबाबत प्रबोधन करणे गरजेचे - लोणीकर

Next

ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. 13- चंद्रभागा नदीचे पावित्र्य राखण्यासाठी शासनाने नमामी चंद्रभागा हा कार्यक्रम हाती घेतला आहे. नदी स्वच्छ ठेवण्यासाठी शासन राबवित असलेल्या या उपक्रमात सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. यासाठी वारकऱ्यांनी नदी स्वच्छतेबाबत त्यांच्या कीर्तनातून प्रबोधन करावे असे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
चंद्रभागा नदी स्वच्छतेबाबत पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यांनी येथील अर्बन बँकेच्या सभागृहात प्रमुख वारकऱ्यांसमवेत चर्चा केली यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री विजय देशमुख, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव संतोषकुमार, आमदार प्रशांत परिचारक, आमदार सुभाष देशमुख, नगराध्यक्षा साधना भोसले, राजन पाटील, वारकरी संप्रदायाचे प्रकाश बोधले, माऊली महाराज, रामभाऊ मोरे, ॲड. संपतराव चव्हाण, वा. ना. उत्पात, कैकाडी महाराज यांच्यासह अन्य वारकरी महाराज उपस्थित होते.
पाणी पुरवठा मंत्री लोणीकर म्हणाले, पंढरपूरात येणारा वारकरी चंद्रभागा नदीचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करत असल्याने ते पवित्र व स्वच्छ असणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने नमामी चंद्रभागा हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमासाठी लागणारा आवश्यक निधी शासन उपलब्ध करुन देणार आहे. तीर्थक्षेत्रांची ठिकाणी स्वच्छ व पवित्र ठेवण्यासाठी शासन योजना राबवित आहे. या योजना केवळ शासनाच्या न राहता त्या लोकांना आपल्या वाटाव्यात आणि नदी स्वच्छ, पवित्र राहण्यासाठी त्यांनीही आपले योगदान द्यावे यासाठी त्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. आणि प्रबोधनाचे हे काम वारकरी त्यांच्या कीर्तनातून चांगल्या प्रकारे करु शकतात असेही पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यावेळी म्हणाले.
नदीचे पाणी दुषित होऊ नये यासाठी नमामी चंद्रभागा या कार्यक्रमातून चंद्रभागा नदीचे शुध्दीकरण करताना नदीकाठी घाट बांधण्याबरोबरच दशक्रिया विधीसारख्या धार्मिक कार्यक्रमासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. नदीत येणारे सांडपाणी अडवून त्यावर प्रक्रिया करुन हे पाणी शेती किंवा उद्योगाला देण्यात येणार आहे. पंढरपूरच्या विकासासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दिला जाईल असल्याचेही पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यांनी सांगितले.
पालकमंत्री देशमुख म्हणाले, नदी स्वच्छतेसाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा असून वारकऱ्यांनीही या कामात आपले योगदान द्यावे. नदी स्वच्छतेचे हे पवित्र काम सर्वांच्या सहकार्यातून हे काम यशस्वी होणार आहे.
यावेळी प्रकाश बोधले, जळगांवकर महाराज, रामभाऊ मोरे, ॲड. संपतराव चव्हाण, वा. ना. उत्पात, कैकाडी महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले. चंद्रभागा नदीचे पावित्र राखण्यासाठी शासनाने नमामी चंद्रभागा हा उपक्रम सुरु केल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले.

Web Title: Need to improve the cleanliness of river Kirtana - Lonikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.