औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वच पुलांच्या आॅडिटची गरज निर्माण झाली आहे. साधारणत: पुलांची वाहननिर्वहन क्षमता २० वर्षांपर्यंत असू शकते. परंतु त्यापुढील वयोमान झालेल्या पुलांचे नियमित आॅडिट करणे गरजेचे असल्यामुळे अतिजुने ११ आणि अलीकडच्या काळातील ७० पुलांच्या स्ट्रक्चरल आॅडिटचे बांधकाम विभागासमोर आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या पुलांची तपासणी करून अहवाल देण्यासाठी अभियंत्यांचे पथक रवाना करण्यात आलेले आहे. प्रत्यक्ष पाहणी करूनच अभियंते अहवाल देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)११ जुने पूल असून अलीकडच्या काळात बांधलेले जिल्हा मार्गांना जोडणारे ७० हून अधिक पूल आहेत. जालन्यातील लोखंडी पूल, पूर्णा येथील पूल हे अतिजुने पूल आहेत. मराठवाड्यात मागील २० वर्षांत बांधलेल्या पुलांचेदेखील स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मराठवाड्यातील सर्वच पुलांच्या आॅडिटची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 04:45 IST