शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करताना चांगली मूल्ये आत्मसात करण्याची गरज- यशोमती ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 18:56 IST

नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करताना चांगली मूल्ये आत्मसात करण्याची गरज आहे.

अमरावती : नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करताना चांगली मूल्ये आत्मसात करण्याची गरज आहे. ज्ञान मिळविण्यासाठी सकारात्मक सातत्य व उजळणी आवश्यक आहे. चांगल्या विचाराचा सकारात्मक पाठपुरावा केल्याने नक्की यश मिळते, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले. शालेय शिक्षण विभागातर्फे सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित नवव्या राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री यशोमती ठाकूर बोलत होत्या. राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, शरद गोसावी, शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे संचालक रवींद्र रमतकर, शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर, रवींद्र आंबेकर, सहसंचालक तेजराव काळे, शिक्षणाधिकारी नीलिमा टाके, प्रिया देशमुख, प्राचार्य संजय खेरडे, राजकुमार अवसरे, शेखर पाटील आदी उपस्थित होते.इन्स्पायर्ड अवॉर्ड उपक्रमातून ग्रामीण भागासह देशातील सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते. अनेक विद्यार्थी नवे संशोधन करून पेटंटही मिळवतात. अशा अभिनव आविष्कारांसाठी उद्योजकांकडून आर्थिक सहकार्य मिळवून देऊ, असे ना. ठाकूर म्हणाल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या विविध अविष्कारांबद्दल कौतुक केले.-----------------अध्यात्म व विज्ञान से हो संसार का भला! समाजात महिलांवरील अत्याचार, मुलींच्या अंगावर अ‍ॅसिड फेकणे अशा अनेक अस्वस्थ करणाºया घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर नव्या पिढीत नीतिमूल्यांची जोपासना करणे आवश्यक आहे. ‘अध्यात्म व विज्ञान से हो संसार का भला’ ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची शिकवण आहे, असे पालकमंत्री म्हणाल्या.  ---------------३४९ प्रतिकृतींचा समावेश राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात ३८४ विज्ञान प्रतिकृतींची निवड प्राथमिक स्तरावर झाली होती. ३७१ प्रतिकृतींची निवड प्रक्रियेतून झाली. त्यापैकी ३४९ प्रतिकृती प्रदर्शनात मांडल्या आहेत. त्या  डिजिटल इंडिया, क्लीन इंडिया, मेक इन इंडिया या संकल्पनेवर आधारित आहेत. १० फेब्रुवारीला प्रदर्शनाचा समारोप होईल. प्रदर्शनात मांडलेल्या १० टक्के प्रतिकृतींची निवड राष्ट्रीय पातळीवर केली जाणार आहे.