शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
4
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
5
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
6
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
7
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
8
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
9
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
12
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
13
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
14
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
15
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
16
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
17
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
18
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
19
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
20
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 

राष्ट्रवादीने ‘सोमेश्वर’ तर काँग्रेसने ‘राजगड’ राखला

By admin | Updated: April 17, 2015 23:20 IST

सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलने काकडे गटाच्या नेतृत्वाखालील शेतकरी कृती समितीच्या सोमेश्वर जनशक्ती पॅनलचा दारुण पराभव केला.

बारामती/सोमेश्वरनगर : जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलने काकडे गटाच्या नेतृत्वाखालील शेतकरी कृती समितीच्या सोमेश्वर जनशक्ती पॅनलचा दारुण पराभव केला. विरोधी पॅनलला एकही जागा मिळविता आली नाही. त्याचबरोबर महत्त्वाच्या उमेदवारांचा पराभव झाला. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीतील पराभवानंतर सोमेश्वरची निवडणूक राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या दृष्टीने महत्त्वाची होती. त्यांना ‘सोमेश्वर’वर सत्ता पूर्ण बहुमताने राखण्यात यश आले. मागील निवडणुकीच्या तुलनेत मतांची टक्केवारी वाढली होती. वाढलेली मते कोणाकडे झुकणार, यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून होता. सुरुवातीला ‘ब’ वर्ग मतदारसंघातून किशोर धर्मराज भोसले यांनी १३३ पैकी ७७ मते मिळवून सोमेश्वर विकास पॅनलचे खाते उघडले. सर्वसाधारण ऊसउत्पादक गटातील निंबूत-खंडाळा गटात महेंद्र काशिनाथ काकडे (७,६८५), दिलीप थोपटे (७,९१९), दौलत बाबूराव साळुंके (७,४०८) यांनी विजय मिळविला. या गटात विरोधक म्हणून निवडणूक लढवीत असलेले पॅनलप्रमुख सतीशराव काकडे, प्रमोदराव काकडे, सोपानराव थोपटे यांना पराभव पत्कारावा लागला. पहिल्याच गटात शेतकरी कृती समिती पुरस्कृत सोमेश्वर जनशक्ती पॅनलला चांगला झटका बसला. त्यानंतर गट क्रमांक २ मुरूम-वाल्ह्यामधून विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप (८,३३४), नामदेव शिंगटे (७,७४५), विशाल गायकवाड (७,८५९) मते मिळवून विजयी झाले. गट क्रमांक ३ होळ-मोरगावमधून सिद्धार्थ गिते (८,३४१), संग्रामसिंह राजे निंबाळकर (८,२१६), कैलास तावरे (८,१३७). गट क्रमांक ४ कोऱ्हाळे-सुपा- सुनील भगत (८,२०४), लालासाहेब माळशिकारे (८,१८६), सचिन खलाटे (७,९६९) विजयी झाले. गट क्रमांक ५ मध्ये मांडकी-जवळार्जुन गटातून उत्तम धुमाळ (८,१७१), मोहन जगताप (८,२८०), शांताराम कापरे (८,२८१) विजयी झाले. त्यामुळे ऊसउत्पादक गट, ‘ब’ वर्गासह १७ जागा राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलने मोठ्या मतांच्या फरकाने जिंकल्या. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वसुंधरा बारवे यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहुल काळभोर यांनी चोख व्यवस्था केली होती. एकूण ३६ टेबलवर मतदान मोजणी करण्याची व्यवस्था करण्यात आली होती.सोमेश्वरच्या निकालाकडे विशेष लक्ष होते. या पार्श्वभूमीवर, दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी सकाळीच एमआयडीसीतील मतमोजणी केंद्रावर धाव घेतली. (प्रतिनिधी)१७ पैकी १७ जागा : सर्वपक्षीय राजगड परिवर्तनला एकही जागा नाही भोर : राजगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली राजगड सहकार पॅनलने १० पैकी १० जागा सुमारे ९२ टक्के मते मिळवून मोठ्या मताधिक्याने जिंकल्या, तर बिनविरोध झालेल्या ७ जागाही याच पॅनलच्या असल्याने १७ पैकी १७ जागा मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळवून पुन्हा एकदा राजगडचा गड राखला आहे.परिवर्तनाचा नारा देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सेना, भाजपाच्या सर्वपक्षीय राजगड परिवर्तन पॅनलला एकही जागा मिळवता आली नाही. तसेच राष्ट्रवादीच्या विद्यमान दोन संचालकांसह काही जण स्वबळावर उभे राहिले होते. त्यांचाही मतदारांनी धुव्वा उडवला. अनेकांची अनामत रक्कम जप्त झाली. सकाळी ८ वाजता भोर येथील खरेदी-विक्री संघाच्या गोडाऊनमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. पहिला निकाल साडेअकरा वाजता लागला. यात काँग्रेसच्या राजगड सहकार पॅनलचे पोपटराव सुके व दत्तात्रय भिलारे हे ४९०२ मतांनी विजयी घोषित करण्यात आले. त्यानंतर कॉँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी वाढत गेली. अर्धा तासाच्या फरकाने निकाल लागत गेला आणि गर्दी वाढत गेली. कॉँग्रेसच्या सर्वच्या सर्व १० उमेदवारांनी ९० ते ९२ टक्के मते घेऊन सरासरी ४९०२ ते ५२४८ या मतांच्या फरकाने विजय मिळवला, तर विरोधकांना ८ ते ९ टक्केच मते मिळाली. दुपारी ३ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम पाटील यांनी सर्व पाचही मतदारसंघांचे निकाल घोषित केले.कोणत्याच गटात क्रॉस व्होटिंग झाले नाही. शोभा जाधव यांचा अपवाद वगळता कॉँग्रेसच्या पॅनलला एकसारखे मतदान झाले. शिवाजी कोंडे वगळता कोणताच उमेदवार एक हजाराचा आकडा पार करू शकला नाही. निवडणुकीत संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली राजगड पॅनलचे १०, सेना, भाजपाचे सर्वपक्षीय पॅनलचे ९, तर राष्ट्रवादीचे ६ जण असे १० जागांसाठी २५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. एकूण मतदार १३१८९ असून, त्यापैकी ५७.१८ टक्के मतदारांनी म्हणजेच ७५४१ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता, तर १७६७ मते अवैध झाली. (वार्ताहर))राजगड कारखान्याची निवडणूक बिनविरोधसाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न करीत होतो. मात्र, ही निवडणूक लागली नाही, तर विरोधकांनी लादली; पण सभासदांनी कोणाच्याही आमिषाला बळी न पडताराजगड पॅनलवर विश्वास दाखवून मोठ्या मताधिक्याने (छप्पर फाडके) विजय मिळवून दिला. त्या मावळ्यांचा विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता तो सार्थ ठरवू.- संग्राम थोपटे, आमदार व राजगड सहकार पॅनलप्रमुखगट नंबर एक बिनविरोध झाल्यामुळे मतदारांनी आपली मते वाया जातील, या भीतीने ती सत्ताधाऱ्यांच्या पारड्यात टाकली. याचा परिणाम सर्व उमेदवारांवर झाला. याशिवाय, कारखान्याच्या बिगरऊस उत्पादक सभासदांमुळेच आमचा पराभव झाला.- प्रा. विलास बांदल, राजगड परिवर्तन पॅनल प्रमुख