कोरेगाव / वाई (जि़ सातारा) : ‘राज्याचे बजेट वार्षिक सात हजार कोटींचे असताना राष्ट्रवादीने तब्बल 8क् हजार कोटींचे सिंचनाचे प्रकल्प सुरू केले. योग्य नियोजन नाही, पुनर्वसन आणि वन विभागाच्या जमिनीचे प्रश्न जैसे थे ठेवत केवळ टेंडरसंस्कृती आणत ठेकेदारी जोपासली. दहा वर्षात 72 हजार कोटी सिंचनावर राष्ट्रवादीने खर्च केले; मात्र एक टक्का देखील सिंचन वाढले नाही. सत्तेसाठी वाट्टेल ते करणा:या राष्ट्रवादीला मतपेटीतून जागा दाखवून द्या,’ असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी केले.
कोरेगाव,वाईमध्ये काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभांमध्ये ते बोलत होत़े त्यांनी राष्ट्रवादी आणि भाजपावर घणाघाती हल्ला चढविला. चव्हाण म्हणाले, आज राज्यात सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर लढत आहेत.
प्रत्येकाला आता आपली ताकद 19 ऑक्टोबरला कळणार आहे. शिवछत्रपतींचा वारसा घेऊन काम करत असलेल्या काँग्रेसने महाराष्ट्राला वेगळी दिशा दिली आहे. हा पक्ष फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने कार्यरत आहे. राष्ट्रवादीचा जन्म ज्यासाठी झाला होता, तो विषय आता संपला आहे. शरद पवार यांचे पुतणो अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यांनी आघाडीबाबत चर्चा सुरू असताना अचानकपणो तीस जागा वाढवून मागितल्या, आम्ही दहा जागा देण्यास तयारी दर्शवली होती; मात्र त्यांनी अचानकपणो अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद ही मागणी केली, ती मान्य होणार नसल्याचे आम्ही स्पष्टपणो सांगताच त्यांनी आघाडी तोडली,’ असेही चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले. (प्रतिनिधी)