शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजेंच्या पारड्यात राष्ट्रवादीचे माप!,उमेदवारी निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 14:44 IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचे माप पुन्हा एकदा विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्याच पारड्यात टाकले. त्यामुळे झाले गेले विसरुन जावे...पुढे-पुढे चालावे, असा संदेशच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जिल्ह्यातील आमदार व प्रमुख नेतेमंडळींना दिला.

ठळक मुद्दे उदयनराजेंच्या पारड्यात राष्ट्रवादीचे माप!,उमेदवारी निश्चितसातारा जिल्ह्यातील सर्व आमदार लोकसभेला करणार एकदिलाने काम

सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचे माप पुन्हा एकदा विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्याच पारड्यात टाकले. त्यामुळे झाले गेले विसरुन जावे...पुढे-पुढे चालावे, असा संदेशच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जिल्ह्यातील आमदार व प्रमुख नेतेमंडळींना दिला.राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई येथे पक्षाची बैठक बोलावली होती. या बैठकीला सातारा जिल्ह्यातील आमदारांसह स्वत: खासदार उदयनराजे भोसले हेही उपस्थित होते.लोकसभा निवडणुकीसाठी उदयनराजेंना सोडून कुणालाही उमेदवारी द्या, अशी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदार मंडळींची होती. राष्ट्रवादीची उमेदवारी मिळत नसेल उदयनराजेंनी भाजपमध्ये जावे, अशी मागणी सातारा विकास आघाडीच्या सदस्यांनी केली होती.

त्याला प्रत्युत्तर देताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीच्या सदस्यांनी तर उदयनराजेंना राष्ट्रवादीने तिकिट दिल्यास शिवेंद्रसिंहराजेंनी भाजपमध्ये जावे, अशी भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.खासदार पवार जी भूमिका घेतील, ती आपल्याला मान्य असेल असे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी या बैठकीतही स्पष्ट केले. त्यानुसार खा. पवार यांनी उदयनराजेंना पुन्हा झुकते माप दिले आहे. सर्व आमदारांनी लोकसभेला मागील सर्व विसरुन प्रचार करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. तसेच आमदारांनीही त्यांचा प्रचार करण्याचे मान्य केले.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Satara areaसातारा परिसर