शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

राष्ट्रवादीचा निर्णय स्थानिक पातळीवरच

By admin | Updated: November 9, 2015 00:32 IST

महापौर निवड घडामोडी : शरद पवारांची मुश्रीफांना सूचना; मुंबईतील आजची बैठक रद्द; सत्तेचा मार्ग सुकर

कोल्हापूर : महापालिकेबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार हसन मुश्रीफ यांना फोनवरून दिल्याचे समजते. त्यामुळे महापालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता स्थापनेचा मार्ग काहीसा सुकर झाला. दरम्यान, आज, सोमवारी मुंबईत शरद पवार यांच्याबरोबर होणारी मुश्रीफ यांची बैठक रद्द झाली.कोल्हापूर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली आहे; पण, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दि. १६ नोव्हेंबरला ‘भाजपचाच महापौर होणार;’, असे वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली. त्यामुळे काँग्रेसला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे की नाही, याबाबत आठवडाभर तर्क-वितर्क काढले जात होते. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे सांगून आणखीन खळबळ उडवून दिली.दरम्यान, रविवारी हसन मुश्रीफ यांनी याबाबत फोनवरून शरद पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी मुश्रीफ यांनी, स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका सांगितली. अगोदरच पक्षाचे १५ नगरसेवक आहेत. त्यात भाजपबरोबर गेले तर पक्षाची पडझड होईल तसेच पक्षाचे नूतन नगरसेवकांनीही भाजपबरोबर जाण्यास विरोध दर्शविला असल्याचे सांगितले. त्यावर शरद पवार यांनी मुश्रीफांना याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा, अशी सूचना केली. त्यामुळे महापालिकेत काँग्रेसबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस राहणार असल्याचे स्पष्ट होत असल्याने काँग्रेस आघाडीचा सत्तेचा मार्ग सुकर झाला आहे.दिवसभर खलबते...कोल्हापुरातील नागाळा पार्क येथील आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानात रविवारी दिवसभर राजकीय खलबते सुरू होती. याठिकाणी पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी, नूतन नगरसेवक, माजी नगरसेवक थांबून होते. यावेळी पदाधिकारी राजकीय कानोसा घेत होते. राष्ट्रवादी अजमावणार नगरसेवकांची मतेकोल्हापूर : महापौर निवडीबरोबर उपमहापौरपदाच्या निवडी सोमवारी (दि. १६) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत उद्या, मंगळवारी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत नगरसेवकांची मते अजमावून उपमहापौरपदासाठी मुलाखती घेणार आहेत.महापालिकेत सध्या काँग्रेस २७, राष्ट्रवादी १५ आणि दोन अपक्ष असे एकूण ४४ नगरसेवकांचे बलाबल आहे. पहिल्या वर्षी काँग्रेसला महापौरपद, तर राष्ट्रवादी काँग्रेसला उपमहापौर पदासह स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण समितीचे सभापतिपद देण्याचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या, मंगळवारी सकाळी दहा वाजता ताराबाई पार्क येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत नूतन नगरसेवकांची मते अजमावून त्यानंतर उपमहापौरपदासाठी नाव निश्चित केले जाणार आहे. सध्या स्थायी समिती मिळविण्यासाठी महेश सावंत, मुरलीधर जाधव व सुनील पाटील इच्छुक आहेत; पण, स्थायी सभापती निवडी होण्यास अवधी आहे. या दिवशी बैठकीत स्थायी व उपमहापौरपदासाठी नाव निश्चित केले जाणार आहे. याच दिवशी दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत नामनिर्देशन भरण्यात येणार आहे. दरम्यान, उपमहापौरपदासाठी कोणीही इच्छुक नसल्याचे समजते.काँग्रेस-राष्ट्रवादीची आज संयुक्त बैठक ‘महापौर’बरोबर अन्य पदांबाबत होणार चर्चाकोल्हापूर : महापौर पदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी दोन्ही कॉँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक कोल्हापुरात होत आहे. उद्या, मंगळवारी महापौर व उपमहापौर पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस असल्याने या बैठकीला विशेष महत्त्व आहे.सध्या महापालिकेत काँग्रेसचे २७, राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ व दोन अपक्ष अशी एकूण ४४ नगरसेवकांची संख्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे आहे. महापौरपदाची निवडणूक दोन्ही काँग्रेसनी प्रतिष्ठेची केली आहे. कोणत्याही स्थितीत महापौर काँग्रेसचा करणार यासाठी सतेज पाटील हे काँग्रेसमधील प्रत्येक नगरसेवकाची प्रतिदिनी माहिती घेत आहेत. कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी पाटील सतर्क आहेत. दरम्यान, हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांची महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी रात्री बैठक होणार आहे. या बैठकीत महापौरपदाचे नाव निश्चित करण्यात येणार आहे. या बैठकीला काँग्रेसचे सर्व नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि काँग्रेसला पाठिंबा देणारे दोन नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.अद्याप आदेश नाही...कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेला भाजपने पाठिंबा दिला आहे. यामुळे कोल्हापूर महापालिकेत भाजप-शिवसेनेबरोबर जाणार असे दिसते; परंतु, शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून भाजपला पाठिंबा द्यावयाचा की नाही, याबाबत शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना कोणताही आदेश आला नसल्याचे सांगण्यात आले.काँग्रेस इच्छुकांच्या आज मुलाखतीकोल्हापूर : महापौर पदासाठी आज, सोमवारी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे नूतन नगरसेवकांची मते अजमावून घेऊन इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत.महापालिकेत काँग्रेसचे २७ नगरसेवक असून, दोन अपक्षांनीही पाठिंबा दिला आहे. २०१० च्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली आहे. महापौर पदासाठी काँग्रेसकडून स्वाती यवलुजे, आश्विनी रामाणे व दीपा मगदूम यांच्यात चुरस आहे. स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटीत पाटील यांच्या उपस्थितीत २७ नगरसेवकांची मते पाटील अजमावून घेणार आहेत. त्यानंतर महापौर पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. या मुलाखतीनंतर महापौरपदासाठी नाव निश्चित केले जाणार आहे. उद्या, मंगळवारी महापौरपदाचा अर्ज दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत नगरसचिवांकडे भरणार आहेत. त्यानंतर सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक होणार आहे.