अंबरनाथ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने रिक्षाचालकाला बेदम मारहाण केली. सुट्या पैशांच्या वादातून ही मारहाण केली असून, रिक्षाचालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या मारहाणीत रिक्षाचालक थोडक्यात बचावला आहे. प्रकाश कासोटे (६७) असे रिक्षाचालकाचे नाव आहे. कासोटे यांच्या रिक्षातून राष्ट्रवादीचा युवा पदाधिकारी निखिल चावरे (२३) हा न्यू कॉलनीपर्यंत आला. मात्र, रिक्षाचालकासोबत सुटे पैसे देण्यावरून त्या दोघांमध्ये वादावादी झाली. तरीदेखील, कासोटे यांनी शेजारील दुकानातून सुटे पैसे घेऊन चावरे याला दिले. तरीही, चावरे याने कासोटे यांना शिवीगाळ केली. यावरून, पुन्हा त्यांच्यात वादावादी झाली. या वादावादीनंतर चावरे याने रिक्षाचालकाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीनंतर चावरे घटनास्थळावरून पळून गेला. जखमी झालेले कासोटे यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. कासोटे हे या मारहाणीत थोडक्यात बचावले असून, आरोपी चावरे याच्याविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची रिक्षाचालकाला मारहाण
By admin | Updated: August 1, 2016 04:32 IST