शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचं ठरलं! मलिक यांच्याबद्दल मोठा निर्णय; 'ममता' मार्गानं करणार भाजपचा मुकाबला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 20:17 IST

राष्ट्रवादी काँग्रेसची ठाम भूमिका; ममता बॅनर्जींच्या मार्गानं करणार विरोधकांचा मुकाबला

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचलनालयानं अटक केली आहे. ईडीनं पहाटे मलिक यांना घरातून ताब्यात घेतलं. आठ तास त्यांची चौकशी झाली. त्यानंतर ईडीनं त्यांना अटक केली. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. 

अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्यावर गंभीर आरोप झाले. ईडीनं त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे मलिक यांच्यावरही मंत्रिपद सोडण्याची नामुष्की ओढवणार असल्याची शक्यता निर्माण झाली. मात्र मलिक यांच्या बाबतीत पक्षानं वेगळी भूमिका घेतली आहे. पक्ष त्यांच्या पाठिशी संपूर्ण ताकदीनिशी उभा राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

नवाब मलिक यांना झालेली अटक चुकीच्या पद्धतीनं झाली आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीनं घेतली आहे. काँग्रेसनंदेखील मलिक यांच्याशी पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. मलिक यांनी राजीनामा देऊ नये अशी भूमिका काँग्रेसनंदेखील घेतली आहे. मंत्रालयाशेजारी असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ तिन्ही पक्षांचे मंत्री, आमदार निषेध आंदोलन करणार आहेत.

ममतांच्या मार्गानं करणार भाजपचा सामनागेल्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक झाली. त्याआधी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या मंत्र्यांवर आरोप झाले. मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या पाठिशी ठामपणे उभ्या राहिल्या. त्यांनी मंत्र्यांचे राजीनामे घेतले नाहीत. त्याचप्रमाणे मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीनं घेतली आहे.

नारायण राणेंचा राजीनामा घेतला का?मंत्र्यांना कोंडीत पकडून, त्यांचं मनोधैर्य खच्ची करण्याचं काम विरोधकांकडून सुरू आहे. सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विरोधकांनी आरोप केले, अटक झाली म्हणून राजीनामा घेणार नाही, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनादेखील अटक झाली होती. त्यांनी राजीनामा दिला होता का, असा सवाल भुजबळांनी विचारला.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जी