शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रिया सुळेंविषयी अपशब्द वापरणाऱ्या तरुणास राष्ट्रवादीकडून कोल्हापूरी खाक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 14:32 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह कॉमेंट करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील चावरे गावच्या किशोरवयीन तरुणास राष्ट्रवादी युवक, विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री चोप देत कोल्हापूरी खाक्या दाखविला.

ठळक मुद्देसुप्रिया सुळेंविषयी अपशब्द वापरणाऱ्या तरुणास राष्ट्रवादीकडून कोल्हापूरी खाक्याचावरे येथील त्या तरुणाने मागीतली माफी

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह कॉमेंट करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील चावरे गावच्या किशोरवयीन तरुणास राष्ट्रवादी युवक, विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री चोप देत कोल्हापूरी खाक्या दाखविला.ईव्हीएम नको, अशी आमची भूमिका आहे, या सुप्रिया सुळे यांच्या विधानाविषयीच्या बातमीची पोस्ट एका वृत्तवाहिनीच्या फेसबुक अकाउंटवर होती. या बातमीच्या कॉमेंट बॉक्समध्ये या तरुणाने सुप्रिया सुळेंविषयी अपशब्द वापरले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयटी सेलने या तरुणाचा शोध घेतला असता तो कोल्हापूर जिल्ह्यातील चावरे येथील असल्याचे निष्पन्न झाले. याची माहिती मिळताच संतप्त कोल्हापूरातील राष्ट्रवादी युवक आणि विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाशी संपर्क साधला, त्याला बोलावणे पाठविले, पण तो आला नाही.

त्यामुळे कार्यकर्त्यांनी चावरे गावी जाउन त्याचा शोध घेत त्याला चोप दिला आणि जाहीर माफी मागायला भाग पाडले, शिवाय या तरुणाचे हे कृत्य त्याच्या आईवडिलांच्या निदर्शनास आणून दिले. कार्यकर्त्यांनी या तरुणाला त्याच्या आईवडिलांच्या पाया पडायला सांगितले.राष्ट्रवादी युवक विद्यार्थी काँग्रेसचे कल्पेश चौगुले, नामदेव पाटील, अर्जुन जाधव, रविराज सोनुले, संतोष वडेर, अजित मोरे आदींनी चावरे गावी जाउन या तरुणाकडून लेखी माफीनामा लिहून घेत या प्रकरणावर पडदा टाकला. 

कोणत्याही क्षेत्रातील महिला असो, त्यांच्याविषयी अपशब्द वापरणे चुकीचे आहे. महिलांचा सन्मान राखणे ही आपली संस्कृती आहे. महिलांचा अपमान करणाऱ्या वृत्तींना राष्ट्रवादी काँग्रेस माफ करणार नाही. चावरे येथील संबंधित तरुणाने केलेला प्रकार निंदनीय आहे. त्याला समज देउन पोलिसांच्या स्वाधीन करण्याच्या उद्देशाने कार्यकर्ते चावरे येथे गेले होते. मात्र त्याने समोर येणे टाळले. कुटूंबियांच्या आग्रहास्तव समोर आला, पण माफी मागण्यास तयार होत नव्हता, म्हणून संयम सुटलेल्या कार्यकर्त्यांनी आईवडीलांसमोरच कोल्हापूरी खाक्या दाखवित माफीनामा लिहून घेतला. त्याच्या करियरचा विचार करुन तक्रार न देता समज दिली आहे.रोहित पाटील,अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, कोल्हापूर

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळेkolhapurकोल्हापूर