शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादीची धडपड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 09:53 IST

निवडणूक आयोगाच्या नोटिशीला राष्ट्रवादीकडून उत्तर

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील वाईट कामगिरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय) यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात आला आहे. या पक्षांचा राष्ट्रीय दर्जा काढून घेण्याबद्दल निवडणूक आयोगानं विचारणा केली होती. तुम्हाला देण्यात आलेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा का काढून घेतला जाऊ नये, असा प्रश्न आयोगाकडून पक्षांना विचारण्यात आला होता. यानंतर सर्व पक्षांनी निवडणूक आयोगाकडे आणखी एक संधी मागितली. येत्या निवडणुकीत चांगली कामगिरी करू, असं उत्तर या पक्षांकडून आयोगाला देण्यात आलं.राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्षानं निवडणूक आयोगाच्या नोटिशीला दिलेलं उत्तर जवळपास सारखंच आहे. 'देशाच्या राजकारणात आपलं मोठं योगदान आहे. त्यामुळे गेल्या काही निवडणुकांमधील कामगिरीच्या आधारावर आपलं मूल्यमापन केलं जाऊ नये,' असा दावा या पक्षांकडून करण्यात आला आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची कामगिरी खालवली. त्यावर भाष्य करताना राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते माजिद मेनन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 15 वर्षे राज्यात सत्तेत होता. याशिवाय राष्ट्रवादीला स्थापनेपासूनच राष्ट्रीय दर्जा मिळाला असल्याचं म्हटलं. स्थापनेनंतर लगेचच झालेल्या निवडणुकीतही पक्षाची कामगिरी राष्ट्रीय दर्जासाठी आवश्यक असलेल्या निकषांनुसार झाली, असा दावादेखील त्यांनी केला. सीपीआयचे महासचिव डी. राजा यांनी निवडणूक आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिलं. 'सीपीआय काँग्रेसनंतर देशातील सर्वात जुना पक्ष आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतही पक्षानं महत्त्वाची भूमिका बजावली होती. लोकसभेत सीपीआयनं विरोधी पक्षाची जबाबदारीदेखील पार पाडली आहे. देशाचं संविधान मजबूत करण्यात पक्षाचा मोठा आहे. त्यामुळे आमचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम राहावा,' असं उत्तर राजा यांनी निवडणूक आयोगाला दिलं आहे.  

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगtmcठाणे महापालिकाlok sabhaलोकसभा