शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

Supriya Sule : "संसदेचा इव्हेंट करू नका, ही लोकशाही आहे, दडपशाही नाही"; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 10:15 IST

NCP Supriya Sule slams Narendra Modi : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

आज नव्या संसद भवनाचा उद्धाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नव्या वास्तुचे उद्धाटन झाले. या सोहळ्यादरम्यान दिल्लीत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  नरेंद्र मोदी यांनीही पूजा आणि हवन केल्यानंतर सेंगोलची पूजा केली. पीएम मोदींनी सेंगोलच्या राजदंडाला साष्टांग नमस्कार केला. यासोबतच त्यांनी उपस्थित साधूसंताचे आशीर्वादही घेतले. वैदिक मंत्रोच्चाराने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले. मात्र याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (NCP Supriya Sule) यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

"संसदेचा इव्हेंट करू नका, ते लोकशाहीतलं आमचं मंदिर आहे. ही लोकशाही आहे, दडपशाही नाही" असं म्हणत निशाणा साधला आहे. माध्यमाशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. "ही लोकशाही आहे, दडपशाही नाही. लोकशाहीमध्ये विरोधक आणि सत्तेतले असे दोन्ही लोक असले पाहिजेत आणि सर्वांचा समन्वय साधूनच देश चालतो. नऊ वर्षात अनेकदा असं झालं आहे की सरकारमधले महत्त्वाचे मंत्री, त्यांना जेव्हा बिल पास करायचे असतात तेव्हा या देशाच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्यांनी फोन केलेले आहेत. त्यामुळे असं काही नाही."

"चर्चा पूर्णपणे त्यांच्या सोयीप्रमाणे, विरोधी पक्ष त्यांना सोयीप्रमाणे लागतो आणि सोयीप्रमाणे तो त्यांच्या कामाचा नसतो. हे दुर्दैवी असून लोकशाहीसाठी घातक आहे" असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. सामनाच्या रोखठोकमधून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. "लोकशाहीसाठी हा सर्वात मोठा धोका, सर्व काही ‘मी’ म्हणजे मोदी. हा अहंकारच आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "या देशाच्या संसदेचे मालक होण्याचा प्रयत्न कोणी करू नये यासाठीचा हा युद्धप्रसंग आहे" असं म्हटलं आहे. सामनाच्या रोखठोकमधून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

"लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका; सर्व काही मी म्हणजे मोदी, हा अहंकारच"

"लोकशाहीसाठी हा सर्वात मोठा धोका आहे. संसदेच्या उद्घाटनास देशाच्या राष्ट्रपतींना निमंत्रण नाही, विरोधी पक्षनेत्यांना मान नाही. सर्व काही ‘मी’ म्हणजे मोदी. हा अहंकारच आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते संसदेचे उद्घाटन न करणे आणि त्या सोहळ्याला त्यांना न बोलावणे हा देशाच्या सर्वोच्च संवैधानिक पदाचा अपमान आहे. ज्या देशाची अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या ट्रेनच्या फरशीवर आणि टॉयलेटच्या बाहेर उभे राहून प्रवास करते, त्या देशात कारण नसताना संसदेच्या इमारतीवर 20 हजार कोटींचा खर्च झाला व त्या संसदेच्या उद्घाटन सोहळय़ात देशाच्या राष्ट्रपतींनाच डावलले याचीही नोंद इतिहासात राहील" असं म्हणत संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद