शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

NCP on Chandrakant Patil: "त्या मुलींनाही ‘घरी जा, स्वयंपाक करा’ असा सल्ला द्याल का?", राष्ट्रवादीचे चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 09:26 IST

NCP on Chandrakant Patil: सोमवारी UPSC परीक्षेचा निकाल जाहीर झाला, यंदाही मुलींनी अव्वल कामगिरी केली आहे. यावरुन राष्ट्रवादीचे चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधलाय.

मुंबई: काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना 'तुम्ही घरी जा स्वयंपाक करा', हे वक्तव्य केले होते. यानंतर महिला आयोगाने चंद्रकांत पाटलांना पत्र पाठवून या वक्तव्याबाबत खुलासा करण्यास सांगितले होते. या वक्तव्यावर पाटलांनी दिलगीरीही व्यक्त केली. पण, आता परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने काल लागलेल्या UPSCच्या निकालावरुन पाटलांवर निशाणा साधला आहे. 

राष्ट्रवादीचा खोचक सवालकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये नेहमीप्रमाणे मुलींनी मोठी कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण देशात पहिले चार क्रमांक मुंलीनी पटकावले आहेत. हाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसनेचंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले आहे. "केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेच्या निकालामध्ये यावर्षी मुलींनी बाजी मारली आहे. महत्त्वाचे म्हणजे पहिले चार क्रमांक पटकावत मुलींनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. चंद्रकांतदादा, आता त्यांनाही ‘घरी जा, स्वयंपाक करा’ असा सल्ला द्याल का?", असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने विचारला आहे. 

 

चंद्रकांत पाटलांकडून अभिनंदनदरम्यान, चंद्रकांत पाटील यांनीदेखील ट्विट करत UPSC परीक्षेत पास झालेल्या मुलींचे कौतुक केले आहे. "UPSC परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून आनंदाची गोष्ट म्हणजे पहिल्या चारही क्रमांकांच्या मानकरी महिलाच आहेत. अष्टावधानी स्त्री कुठल्याच क्षेत्रात कुणापेक्षाही कमी नाही, हेच यातून पुन्हा अधोरेखित होतंय. लखलखतं यश मिळवलेल्या स्त्री शक्तीला सलाम. यशस्वी उमेदवारांचं अभिनंदन!", असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील  ?सुप्रिया सुळेंवर टीका करताना चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली होती. "कशासाठी राजकारणात राहता? घरी जा घरी, स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही एका मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची असते? कळत नाही, एक शिष्टमंडळ पाठवायचं? आता घरी जाण्याची वेळ आली आहे. तुम्ही दिल्लीत जा, नाही तर मसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या," अशी टीका पाटलांनी केली होती. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसupscकेंद्रीय लोकसेवा आयोग