शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Pawar NCP : शरद पवारांनी सोपवली मोठी जबाबदारी; प्रफुल्ल पटेल म्हणाले, "माझ्यासाठी पद..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 13:34 IST

सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल या दोघांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष पद देण्यात आले आहे.

राष्ट्रवादीचा आज २५  वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी यांना संबोधित करताना पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल या दोघांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष पद देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यानंतर कार्यकर्ते आणि नेतेमंडळींच्या आग्रहास्तव त्यांनी आपला निर्णय मागे घेतला. प्रफुल्ल पटेल यांनी पवारांच्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली.

"माझ्यासाठी पद महत्त्वाचं नाही. मी पूर्वीपासूनच काम करतोय. शरद पवारांसोबत देशभरात मी दिसत होतो, पक्षासाठी काम करत होतो. पद नवीन असलं तरी जबाबदारी तिच आहे. मला ती पार पाडायाची आहे. आजपर्यंत ती पार पाडत होतो आणि यापुढेही पार पाडेन. पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळवून देणं आणि यशस्वी करणं ही महत्त्वाची जबाबादारी आमच्यावर आहे," असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

"पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळवून देणं ही सर्वाची जबाबादारी आहे. नागालँडमध्ये आमच्या पक्षाला मान्यता मिळाली. आणखी राज्यांमध्ये आमचे आमदार आणि मतांची टक्केवारी आणू शकू ही महत्त्वाची बाब राहील. पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळाल्यानंतर ती जाणं ही शोभणारी बाब नाही. आम्हालाही दु:ख आहे. राजकारणात चढ उतार असतात. आता उतार असला तरी आम्ही नक्कीच प्रगती करणार," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

२४ वर्ष सेवा करण्याची संधी - पवार२४ वर्षे जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. भाजपाला अनेक राज्यांनी दूर केलेय, आता तुमची जबाबदारी. सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावं, असं आवाहन शरद पवार यांनी केलं. यानंतर पवार यांनी पुन्हा बोलत असताना त्यांनी राष्ट्रवादीतील जबाबदाऱ्यांची घोषणा केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळेprafull patelप्रफुल्ल पटेल