शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार गट, उद्धवसेनेला मोठा धक्का; अनेक पदाधिकाऱ्यांचा रामराम, शिवसेनेत पक्षप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 14:21 IST

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून आपल्या प्रवेशामुळे शिवसेना अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

Shiv Sena Shinde Group News: नाशिक जिल्ह्यातील येवला लासलगाव विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उबाठा गटाच्या विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील नंदनवन या  निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून आपल्या प्रवेशामुळे नाशिक जिल्ह्यात शिवसेना अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

या वेळी शिंदे म्हणाले की, नव्याने पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनापासून स्वागत असून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देतो. तसेच आमदार नरेंद्र दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी पक्षात प्रवेश करत असल्याने पक्ष दिवसेंदिवस अधिक बळकट होत असल्याचे मत व्यक्त केले.

आज झालेल्या पक्षप्रवेशमात  प्रामुख्याने राष्ट्रवादी अल्पसंख्याक विकास सोसायटीचे अध्यक्ष शकील पटेल, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे, येवला मर्चंट बँकेचे उपाध्यक्ष सुभाष गांगुर्डे, छावा संघटनेचे जिल्हा सरचिटणीस अविनाश देशमुख, भटक्या आणि विमुक्त जमाती महासंघाचे अध्यक्ष शरद राऊत, उबाठा महिला संघटक किर्ती निरगुडे, माजी नगरसेवक जयश्री बर्डे, संतोष थोरे, दिगंबर दवनडे आणि असंख्य पदाधिकारी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता. 

नाशिक जिल्ह्यातील विविध भागांतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे पक्षाची ताकद वाढणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून पक्ष दिलेला शब्द पाळतो, असे सांगत शिंदे यांनी नव्या सदस्यांना पक्षाच्या बळकटीसाठी चांगले काम करण्याचे आवाहन केले. तसेच गरीब कुटुंबातील कार्यकर्त्यालाही शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी दिली असल्याचा उल्लेख करत पक्ष कार्यकर्त्यांना नेहमीच संधी देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांचे अभिनंदन करत त्यांच्या माध्यमातून शिवसेना आणखी मजबूत होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Pawar, Uddhav Factions Hit Hard; Leaders Join Shinde's Shiv Sena

Web Summary : Key officials from NCP's Pawar group and Uddhav Thackeray's faction in Nashik joined Shiv Sena (Shinde). Deputy CM Eknath Shinde welcomed them, expressing confidence this strengthens the party in Nashik. Several office bearers including Shail Patel, Amol Shinde joined Shiv Sena.
टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे