शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

"कशाला तुमचे खापर शरद पवारांवर फोडता, सत्तापिपासूमुळे वाण नाही पण आता गुण लागला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 11:35 IST

NCP Rupali Patil Thombare Slams Ramdas Kadam : राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे य़ा रामदास कदम यांच्यावर संतापल्या आहेत.

मुंबई - रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी अखेर आपल्या नेतेपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सोपवला आहे. "52 वर्षे मी कामं केलं पण माझ्यावर नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आयुष्याची संध्याकाळ अंधारमय होईल असं कधीच वाटलं नव्हतं" हे सांगताना रामदास कदम अत्यंत भावूक झालेले पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी शरद पवारांवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. "शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडला" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. यानंतर आता राष्ट्रवादीने रामदास कदम यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 

"कशाला तुमचे खापर शरद पवारांवर फोडता, सत्तापिपासूमुळे वाण नाही पण आता गुण लागला" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (NCP Rupali Patil Thombare) य़ा रामदास कदम यांच्यावर संतापल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. "शिवसेना पक्षातील काही लोक व त्यांचे बंडखोर आमदार यांच्यात काही झाले की आलेच मा. शरद पवार साहेबांना मध्ये घ्यायला. बाबांनो तुमचे काम, तुमचे वाद स्वतःच्या हिंमतीवर करा. कशाला तुमचे खापर मा.शरदजी पवार साहेबांवर फोडता.#सत्तापिपासूमुळे वाण नाही पण गुण लागला वाटत तुम्हाला" असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

रामदास कदम यांनी "मी खूप अस्वस्थ आहे. मी राजीनामा दिल्याने मी समाधानी नाही, आनंदी नाही. 52 वर्षे लढणारा नेता राजीनामा का देतो? याचा विचार करायला हवा. दु:ख होतं वेदना होतात. मी प्रामाणिकपणे हात जोडून आपण राष्ट्रवादीसोबत बसू नका असं सांगितलं होतं. बाळासाहेबांनी हिंदुत्व वाढवलं. ही बाळासाहेबांची शिवसेनाची नाही, शरद पवारांनी डाव साधला, उद्धव ठाकरे भोळे आहेत. त्यांना पवारांचा डाव कळला नाही. शरद पवारांनी पक्ष फोडला" असं म्हटलं आहे. 

"शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडला"; रामदास कदम ढसाढसा रडले, म्हणाले....

"उद्धव साहेबांनी नोंद घेतली असती तर एकनाथ शिंदेंसह 51 आमदारांवर ही वेळच आली नसती. किती जणांची हकालपट्टी करणार त्यापेक्षा तुमच्या आजुबाजुला कोण आहे ते आधी पाहा... कोण बैल म्हणतो, कोण, कुत्रे म्हणतोय मग आमदार चिडले... मी एकनाथ शिंदे गुवाहाटीला असताना बोललो... प्रयत्न केले पण यश आले नाही. मराठी माणूस जगला पाहिजे. शिवसेना जगली पाहिजे, आमच्यासारखा कडवा सैनिक का जातो? हे पाहिलं पाहिजे" असं देखील रामदास कदम यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.  

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारRamdas Kadamरामदास कदम