शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या लग्नात अक्षता टाका; उदयनराजे भाजपासाठी 'बॅटिंग' करतात तेव्हा...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 11:44 IST

'एका महिन्याभरात माझं लग्न आहे आणि तीन-चार महिन्यांनंतर या सगळ्यांचं लग्न आहे. अक्षता टाकायचं काम करा एवढंच सांगतो तुम्हाला'....

ठळक मुद्देउदयनराजे भोसले यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचं भरभरून कौतुकएका महिन्याभरात माझं लग्न आहे आणि तीन-चार महिन्यांनंतर या सगळ्यांचं लग्न आहे. अक्षता टाकायचं काम करा.उदयनराजेंना राष्ट्रवादीचं तिकीट मिळणार की नाही, याबद्दल उलटसुलट चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचं भरभरून कौतुक करतानाच, अप्रत्यक्षपणे त्यांना मतं देण्याचं आवाहन केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

'तुम्ही आणि तुमच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जे निर्णय घेतले, ते यापूर्वी कुणीही घेतले नव्हते. घोषणा भरपूर झाल्या, पण अंमलबजावणी झाली नव्हती', असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र सरकारची पाठ थोपटली. साताऱ्यात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मरणार्थ उभारल्या जाणाऱ्या स्मारकाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसही स्टेजवर होते. 

एका महिन्याभरात माझं लग्न आहे आणि तीन-चार महिन्यांनंतर या सगळ्यांचं लग्न आहे. अक्षता टाकायचं काम करा एवढंच सांगतो तुम्हाला. इतक्यात टाकू नका. नाहीतर त्यावेळी म्हणाल, तुम्ही सांगितल्या म्हणून अक्षता टाकल्या आता शिल्लकच राहिल्या नाहीत, असं मजेशीर; पण तितकंच सूचक वक्तव्य उदयनराजे यांनी केलं.

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानं, राष्ट्रवादी काँग्रेसने आपले काही उमेदवार निश्चित केलेत. परंतु, सातारा लोकसभा मतदारसंघातला उमेदवार अद्याप ठरलेला नाही. त्यामुळे उदयनराजेंना तिकीट मिळणार की नाही, याबद्दल उलटसुलट चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर, उदयनराजेंनी देवेंद्र सरकारसाठी बॅटिंग केल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसले