शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जयंतरावांनी माझा करेक्ट कार्यक्रम केलाय; सुप्रिया सुळेंच्या विधानानं हशा पिकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 20:28 IST

पुढचे ११ महिने आपल्याला काय करायचंय हे नियोजन आपण आखले पाहिजे. बूथ कमिटीचे काम राष्ट्रवादीने प्राधान्याने केले असं सुप्रिया सुळेंनी सांगितले.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्य महोत्सवीवर्षानिमित्त पक्षाकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शरद पवारांपासून पक्षाचे सर्वच दिग्गज नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाला पहिल्यांदाच पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा म्हणून सुप्रिया सुळे यांनी भाषण केले. परंतु भाषणाला सुरुवात करताना सुप्रिया सुळेंनी जयंत पाटलांकडे बघून जयंत पाटलांनी माझा करेक्ट कार्यक्रम केलाय असं वाटायला लागलं असं विधान केल्यानं सभागृहात हशा पिकला. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जयंतरावांनी मला बोर्ड एग्जामला बसवले, छगन भुजबळांच्या भाषणानंतर आता गंभीर प्रशासकीय भाषण करणे हे खूप अडचणीचे काम असते. अनेक वक्त्यांना ही अडचण येत असेल. आज फार मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली आहे. आता काळच ठरवेल ही जबाबदारी मी पेलू शकेन की नाही. परंतु देशातील आणि राज्यातील ज्या ज्या जबाबदाऱ्या पक्ष माझ्यावर टाकेल पूर्ण निष्ठेने आणि मेहनतीने मी पूर्ण करेन असं त्यांनी सांगितले. 

तसेच पुढचे ११ महिने आपल्याला काय करायचंय हे नियोजन आपण आखले पाहिजे. बूथ कमिटीचे काम राष्ट्रवादीने प्राधान्याने केले पाहिजे. मंत्री राहिलेल्या आमदारांना ५-७ मतदारसंघ द्यावेत, त्यांचा अनुभव त्या मतदारसंघात घ्यावा. पक्षाशी सलग्न आघाडीने कार्यक्रम राबवावे. दौरा आणि संपर्क यात खूप चांगले काम करतो. पण प्रत्येक जिल्ह्यात नेत्याने महिन्यातून एकदा गेले पाहिजे. पुढील वर्षभर राज्य पिंजून काढा. जेणेकरून राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा दुसरा पक्षच नाही असं लोकांना वाटायला हवा. आपण भूमिका काय घेतो याबाबत स्पष्टता हवी असंही सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना सांगितले. 

दरम्यान, धनगरांना आरक्षण देण्याबाबत टीसचा रिपोर्ट सरकारने पब्लिश केला नाही. मी स्वत: धनगर समाजाबाबत संसदेत ५ दिवस बोलणारी मी खासदार आहे. एकच विधेयक आणा, मराठा, धनगर आणि सर्वच आरक्षणाबाबत चर्चा झाली. त्यावेळी धनगरांना आरक्षण देण्यात आमचा विरोध आहे असं भाजपा नेत्याने संसदेत ऑन रेकॉर्ड सांगतिले. राज्यात आरक्षण देऊ म्हणतात आणि दिल्लीत त्यांची भूमिका बदलते असा आरोप सुप्रिया सुळेंनी भाजपावर केला. 

देशाला कुणी वाचवले असेल तर...कोविड काळात राजेश टोपे यांनी जे काम केले त्याचे कौतुक देशपातळीवर होतेय. जातीवरून अनेक पक्ष सध्या बोर्ड लावतात. रेमडेशिवीरसाठी किती लोकांनी फोन केले, ते औषध सिपला कंपनी बनवते, त्याचा मालक यूको हमीद आहेत. तुम्हाला पूनावालाने निर्माण केलेली लस चालते. तुम्हाला औषध चालते, पण धर्म आला तर त्यांचा द्वेष तुम्ही करता. रेमडेशिवीर घेताना बनवणाऱ्याची जात विचारली का? पूनावाला हे अल्पसंख्याक आहेत. देशाला कुणी वाचवले असेल तर अल्पसंख्याक असलेले सायरस पुनावाला यांच्या कंपनीने वाचवले असं सांगत सुप्रिया सुळे यांनी हिंदू-मुस्लीम संघर्षावर भाष्य केले. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेस