शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

Maharashtra Politics: भाजपचे ‘मिशन बारामती’ आव्हान सुप्रिया सुळेंनी स्विकारले; म्हणाल्या, “मी स्वत:...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 21:06 IST

Maharashtra News: अमेठी जिंकली तर बारामती जिंकायला काय अडचण, असा सवाल करत बारामतीत विकास झालेलाच नाही, असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.

Maharashtra Politics:  २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Election 2024) अनेक पक्षांनी आतापासूनच तयारीला सुरुवात केली असून, यामध्ये भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने रणनीति आखली असून, त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय नेते आणि मंत्री देशभरात दौरे करत आहेत. महाराष्ट्रात भाजपच्या मिशन बारामतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामनबारामती दौऱ्यावर जाणार आहेत. यातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) हे आव्हान स्विकारल्याचे सांगितले जात आहे. 

कर्जत जमखेडचे माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री राम शिंदे यांनी निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यावर संदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी राम शिंदे यांनी बारामती जिंकणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. आम्ही अमेठी जिंकली तर बारामती जिंकायला काय अडचण, असा सवाल राम शिंदे यांनी केला. त्याचसोबत बारामतीचा विकास झालेलाच नाही, असा आरोप राम शिंदे यांनी केलाय. याबाबत सुप्रिया सुळे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. 

मी स्वतः निर्मला सीतारामन यांना बारामतीचा विकास दाखवेन

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामतीत येत आहेत. सीताराम बारामती आल्यानंतर बारामतीमध्ये अनेक संस्था आहेत, ज्या त्यांनी पाहाव्यात. त्यासाठी माझी ही त्यांना विनंती असेल की, कृषी विज्ञान केंद्र आणि इतर संस्था पाहव्यात यासाठी त्यांना आमंत्रण देण्यात आले आहे . जर सीतारामन यांना वेळ असेल तर मी स्वतः फिरून त्यांना बारामती दाखवेन, असे प्रतिआव्हान सुप्रिया सुळे यांनी दिले आहे. 

दरम्यान, बारामती तालुक्यात अजून चाळीस गाव पिण्याच्या पाण्यापासून दूर आहेत. जलयुक्त शिवारमूळे थोडाफार दिलासा त्या तालुक्यात मिळाला आहे. अधिक क्षेत्र सिंचनाखाली क्षेत्र येणे आवश्यक आहे. रस्त्यांची अतिशय वाईट अवस्था आहे. यामुळे ते जो विकासाचा दावा करत आहेत तो सपशेल फोल ठरलेला आहे, असा आरोप राम शिंदे यांनी केला आहे.

 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेnirmala sitharamanनिर्मला सीतारामनBaramatiबारामती