NCP SP MP Supriya Sule News: सदोष मतदार याद्यांच्या संदर्भात आम्ही काढलेल्या मोर्चानंतर, स्वतः सत्ताधाऱ्यांनीच कबूल केले आहे की या राज्यात दुबार मतदान होत आहे. पण निवडणूक आयोग मात्र यावर काहीही बोलत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
सत्तेमध्ये असलेले तिन्ही पक्ष कबूल करत आहेत की, याद्यांमध्ये काहीतरी गडबड आहे. एकीकडे भाजपाने सदोष मतदार याद्यांच्या संदर्भात काढलेल्या मोर्चाला विरोध म्हणून मूक आंदोलन केले आणि दुसरीकडे मतदार याद्यांमध्ये दोष आहे हे कबूल केले, यावरून भाजपामध्येच दोन परस्परविरोधी मतप्रवाह आहेत, हे सिद्ध होते. एका सशक्त लोकशाहीमध्ये शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला भेटण्यात काय अडचण आहे? मग न्याय मागायचा कुणाकडे? न्याय मागणे हा आमचा मूलभूत अधिकार आहे, आता तोही हिरावून घेणार का ही लोक? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
निवडणूक आयोग या संपूर्ण प्रकरणावर शांत का?
सत्ताधारी पक्ष स्वतःच याद्यांमध्ये घोळ असल्याचे मान्य करत असताना, निवडणूक आयोग या संपूर्ण प्रकरणावर शांत का आहे. या गंभीर आरोपांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आयोगाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, कोण जिंकेल कोण हरेल, यापेक्षा जे काही व्हावे ते पारदर्शक व्हावे, अशी आमची अपेक्षा आहे. दुबार मतदार हे संविधानच्या विरोधात आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकणाची सखोल चौकशी करावी आणि मगच क्लीन चीट द्यावी. निकाल लागण्यापूर्वी कृपा करून कोणाला क्लिन चीट देऊ नका, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली. तसेच, रोहित आर्य एन्काऊंटर प्रकरणी माजी मंत्री दीपक केसरकर यांची पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
Web Summary : Supriya Sule alleges duplicate voting in Maharashtra, questioning the Election Commission's silence. She highlights conflicting views within the ruling BJP and demands transparency in the voter list rectification process. Sule also urged thorough investigation into the doctor suicide case and Rohit Arya encounter.
Web Summary : सुप्रिया सुले ने महाराष्ट्र में दोहरी वोटिंग का आरोप लगाया और चुनाव आयोग की चुप्पी पर सवाल उठाया। उन्होंने भाजपा के भीतर विरोधाभासी विचारों पर प्रकाश डाला और मतदाता सूची सुधार प्रक्रिया में पारदर्शिता की मांग की। सुले ने डॉक्टर आत्महत्या मामले और रोहित आर्य मुठभेड़ की जांच का भी आग्रह किया।