शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या नेत्यांना हव्यात २ आकडी जागा; शुक्रवारी अजित पवारांसह नेते दिल्लीला जाणार; चर्चेनंतर अंतिम सूत्र ठरणार

By दीपक भातुसे | Updated: March 7, 2024 07:00 IST

आम्हाला चार-पाच जागा दिल्या जाणार असल्याच्या चर्चेत तथ्य नाही. महायुतीत बुधवारी जागावाटपाचे आकडे निश्चित झाले नाहीत. अमित शाह आणि आमच्यात प्राथमिक चर्चा झाली. आम्ही लवकरच दिल्लीला जाणार असून, तिथे अंतिम निर्णय घेतला जाईल, असे एका वरिष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात सत्ताधारी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किमान दोन आकडी जागा हव्यात, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे. जागावाटपाची चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे शुक्रवारी दिल्लीला जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

आम्हाला चार-पाच जागा दिल्या जाणार असल्याच्या चर्चेत तथ्य नाही. महायुतीत बुधवारी जागावाटपाचे आकडे निश्चित झाले नाहीत. अमित शाह आणि आमच्यात प्राथमिक चर्चा झाली. आम्ही लवकरच दिल्लीला जाणार असून, तिथे अंतिम निर्णय घेतला जाईल, असे एका वरिष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

१६ जागांचा घेतला आढावा  राष्ट्रवादीने नाशिक, दिंडोरी, गोंदिया - भंडारा, दक्षिण मुंबई, हिंगोली, धाराशिव, रायगड, कोल्हापूर, बुलढाणा, माढा, सातारा, शिरूर, बारामती, परभणी, अहमदनगर दक्षिण, गडचिरोली या १६ जागांचा आढावा घेतला असून, त्यातील १३ जागांची यादी भाजपला सादर केली आहे. मात्र, जागावाटपात ११ जागांवर तडजोड करण्यास पक्ष तयार असल्याचे पक्षातील सुत्रांनी सांगितले. 

शिवसेनेच्या बरोबरीने जागांचा आग्रह  पक्षाला लोकसभेच्या केवळ चार - पाच जागांची ऑफर दिल्याचा इन्कार सुनील तटकरे यांनी केला, तर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही यावर भाष्य करणार नसल्याचे सांगितले. राष्ट्रवादीला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेच्या बरोबरीच्या जागा मिळाल्या पाहिजेत, यावर मी फक्त भाष्य करू शकतो, असे भुजबळ म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक