शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

NCP नेत्यानं केली चंद्रकांत पाटलांची पाठराखण; उद्धव ठाकरेंना करून दिली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 12:40 IST

चंद्रकांत पाटील यांनी जे विधान केले त्याच्याशी मी अंशत: सहमत आहे असं राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

मुंबई - बाबरी पाडल्याच्या घटनेवर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी जे विधान केले त्यावरून बराच वाद निर्माण झाला आहे. चंद्रकांत पाटलांनी हे विधान टाळायला हवं होते. ते त्यांचे वैयक्तिक मत आहे असं सांगत भाजपाने या वादात हात वर केले आहेत. तर दुसरीकडे पूर्वाश्रमीचे भाजपा नेते आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटलांच्या विधानाची पाठराखण केली आहे. 

एकनाथ खडसे म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी जे विधान केले त्याच्याशी मी अंशत: सहमत आहे. बाबरीचं जे आंदोलन झाले. कारसेवक म्हणून अनेकजण तिथे गेले होते. त्यात मीही सहभागी होतो. १५ दिवस मला तुरुंगवास भोगावा लागता. पोलिसांनी मला मारहाणही केली होती. दोन्ही वेळेस त्या आंदोलनात फार कमी प्रमाणात शिवसैनिक होते हे मी स्वत: अनुभवले आहे. शिवसेनेचे मंत्री कोण उपस्थित होते, जे आले तेदेखील उशीरा आले. सुभाष देसाई त्यात होते. सगळे झाल्यावर आले होते. कारसेवक म्हणून आम्ही गेलो, पायी गेलो, ट्रेनने गेलो. पोलिसांचा मार खाल्ला, अत्यंत वाईट वागणूक दिली. तुरुंगवास भोगला, त्यावेळी किती शिवसैनिक होते? असा सवाल त्यांनी विचारला आहे. 

तसेच बाबरी ढाचा पडल्यानंतर त्याची जबाबदारी कुणी घ्यावी? तेव्हा भाजपा ती जबाबदारी घेण्यास मागेपुढे पाहत होती. आम्ही पाडलंय हे म्हणण्याचे धैर्य भाजपात नव्हते. त्या काळात बाळासाहेब ठाकरेंनी होय, बाबरी मशिद माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे असं विधान केले. हे आंदोलन खूप वर्ष चालले. शिलापूजन, जलपूजन, गंगाजलपूजन झाले वैगेरे ८५-८६ पासून आम्ही या आंदोलनात सहभागी होतो. यात बाबरी मशिदीचा ढाचा पाडला तोपर्यंत शिवसेनेचा सहभाग फार कमी दिसला असंही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले. 

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?  बाबरी मशीद पाडण्यात विश्व हिंदू परिषद, कार सेवक, बजरंग दल आणि दुर्गावाहिनीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यात शिवसेनेचे कार्यकर्तेही असतील; पण बाबरी मशीद पाडण्याचा प्लॅन शिवसेना भवनात झाला नाही असं विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. 

उद्धव ठाकरेंचा पलटवारचंद्रकांत पाटलांच्या विधानावरून वाद पेटल्यानंतर यावर उद्धव ठाकरेंनी खोचक प्रतिक्रिया दिली. ठाकरे म्हणाले की, जेव्हा बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात होते. सध्याचे पंतप्रधान पण कुठेच नव्हते. तेव्हाचे भरकटलेल्या जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांच्या वक्तव्याचा संदर्भ पाहा. तेव्हा बाळासाहेबांनी जबाबदारी स्वीकारली. बाळासाहेब म्हणाले हे कसले नपुंसक नेतृत्व. आता एक एक बिळातून बाहेर येतायत. आमच हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व. भाजपाकडे कधीच शौर्य नव्हते. मुंबई दंगलीवेळी पण शिवसैनिक रस्त्यावर लढले. सत्तेसाठी लाचारी करणारे मिंदे यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी बाळासाहेबांचे नाव घेऊ नये असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलeknath khadseएकनाथ खडसेShiv SenaशिवसेनाRam Mandirराम मंदिर