शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडी म्हणजे मल्टीस्टारर सिनेमा?; अजित पवारांचं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 17:10 IST

पत्रकारांच्या प्रश्नाला अजित पवारांचं उत्तर

पुणे: महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे मल्टीस्टारर सिनेमा असल्याचं सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केलं होतं. अशोक चव्हाण यांच्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जुन्या कढीला कशाला ऊत आणायचा. बरं चाललंय, चालू द्या, असं म्हणत अजित पवारांनी चव्हाण यांच्या विधानावर फारसं भाष्य करणं टाळलं. पवारांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला.पुण्यात आज अजित पवारांनी नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन मागील सरकारच्या कामाचा आणि योजनांचा आढावा घेतल्याचं अजित पवारांनी पत्रकारांना सांगितलं. सर्व विभागांना निधीचं योग्य वाटप होणार असल्याची हमीदेखील त्यांनी यावेळी दिली. या बैठकीला पालकमंत्रीदेखील उपस्थित होते, असं पवारांनी सांगितलं. चंद्रपुरातल्या दारुबंदीवर कोणताही पुनर्विचार केला गेला नसल्याचं ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकार म्हणजे मल्टीस्टारर सिनेमा असल्याचं काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले होते. त्याबद्दल प्रश्न विचारलं असता, अजित पवारांनी फारसं बोलणं टाळलं. जुन्या कढीला कशाला ऊत आणायचा. बरं चाललंय, चालू द्या. मला माझ्याकडून काही अडचण आणायची नाही. माझे अधिकारी वेळेत यायला तयार आहेत मी काम करतोय, अशी त्रोटक प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. काय म्हणाले होते अशोक चव्हाण?तीन पक्षाचं सरकार म्हणजे मल्टीस्टारर सिनेमा. सिनेमात तीन-तीन हिरो पाहिजेत, असं सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केलं होतं. संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चाललं पाहिजे, हे शिवसेनेकडून लिहून घ्या, असं सोनिया गांधींनी सत्ता स्थापनेच्या वेळी सांगितलं होतं, असंदेखील अशोक चव्हाण म्हणाले होते. तीन पक्षाचं सरकार म्हणजे मल्टिस्टारर सिनेमा. सुदैवानं आमचा सिनेमा सध्या बरा चालला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा उद्धव ठाकरे, कुणालाही वाटलं नाही की आम्ही एकत्र येऊ. पण हल्ली मल्टिस्टारर सिनेमाचा जमाना आहे. सिनेमात तीन-तीन हिरो पाहिजेत, असं चव्हाण यांनी म्हटलं.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारAshok Chavanअशोक चव्हाणmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी