शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

“३२ वर्षांपासून ओळख, यावेळी मदत करा”; नाथाभाऊंनी घेतली हितेंद्र ठाकूर यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 19:42 IST

Vidhan Parishad Election 2022: बविआकडे तीन मते आहेत. मत मागायला आलो आहे. हितेंद्र ठाकूर योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.

विरार: आताच्या घडीला राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Vidhan Parishad Election 2022) राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला असला, तरी या पराभवाचा वचपा काढण्यासाठी महाविकास आघाडीने जय्यत तयारी केली आहे. विधान परिषद निवडणुकीत छोटे पक्ष आणि अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना उमेदवारी जाहीर करत भाजपसमोर आव्हान उभे केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकनाथ खडसे यांनी आपला विजय निश्चित करण्यासाठी अनेकांच्या भेटी-गाठी घेण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे नाथाभाऊंनी भाजपच्या अनेक आमदारांशी संपर्क साधून निवडणुकीत मत देण्याचे आवाहन केल्याचे सांगितले जात आहे. 

यातच एकनाथ खडसे यांनी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांच्या भेट घेतली. विरारच्या विवा महाविद्यालयात या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड तब्बल तासभर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे यांनी या भेटीविषयी माहिती दिली. दुसरीकडे, बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत. या तीन मतांसाठी हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा सुरू आहे. एकनाथ खडसे यांच्याआधी भाजपच्याही अनेक नेत्यांनी हितेंद्र ठाकूर यांनी भेट घेतली होती. 

३२ वर्षांपासून ओळख, यावेळी मदत करा

मी उमेदवार आहे. बविआकडे तीन मते आहेत. त्यामुळे मी मत मागायला आलो आहे. हितेंद्र ठाकूर योग्य तो निर्णय घेतील. मी शब्द घेण्यासाठी आलो नाही, तर मत मागण्यासाठी आलो. उमेदवार म्हणून मते मागणे आपले काम आहे. आमचा ३२ वर्षांपासूनचा संबंध आहे. या भेटीत राजकारणासह कौटुंबिक चर्चाही झाली, अशी माहिती खडसे यांनी दिली. तत्पूर्वी, हितेंद्र ठाकूर स्वत: आमदार आहेत. त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूरदेखील विधानसभेचे सदस्य आहेत. मात्र ते सध्या अमेरिकेत आहेत. त्यांनी लवकरात लवकर भारतात परतावे आणि आपल्या बाजूने मतदान करावे यासाठी भाजप आणि मविआचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी देखील ठाकूर यांची भेट घेतली आहे.

दरम्यान, विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची २७ मतांची आवश्यकता आहे. राज्यसभेप्रमाणे मतदान झाले तर भाजपकडे १२३ संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपच्या ४ जागा सहज निवडून येऊ शकतात. पाचव्या उमेदवारासाठी भाजपला १२ मते कमी पडतात. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे १६१ संख्याबळ आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आमदार विधानपरिषदेत जातील. तसेच मित्र पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने काँग्रेसच्या वाट्यालाही दोन जागा येऊ शकतात. 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकeknath khadseएकनाथ खडसेHitendra Thakurहितेंद्र ठाकूर