शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Parishad Election 2022: विधान परिषद निकालापूर्वीच जळगावात जल्लोष; नाथाभाऊंच्या अभिनंदनाचे मुक्ताईनगरात लागले फलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 20:05 IST

Vidhan Parishad Election 2022: एकनाथ खडसे यांच्या विजयाची खात्री असल्याने कार्यकर्त्यांकडून मुक्ताईनगरमध्ये बॅनरबाजी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

जळगाव: महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीची (Vidhan Parishad Election 2022) प्रक्रिया सुरू आहे. सर्वच्या सर्व आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. काँग्रेसने भाजपच्या दोन आमदारांच्या मतदानावर घेतलेले आक्षेप फेटाळल्यानंतर सुमारे दोन तासांनी मतमोजणीला सुरुवात झाली. महाविकास आघाडी आणि भाजपसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झालेली आहे. कारण दोन्ही बाजूंनी आपापले उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा केला आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याकडे जळगावकरांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. विधानपरिषदेची ही निवडणूक खडसे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची समजली जात आहे. खडसे यांच्या विधानपरिषद निवडणुकीतील विजयावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याआधीच मुक्ताईनगर शहरात ते विजयी झाल्याबद्दल अभिनंदनाचे फलक लागले आहेत. 

माजी मंत्री एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली असून, यासाठी मतदान झाले आहे. काही वेळातच निकाल लागणार आहे. तथापि, याआधीच मुक्ताईनगरात जल्लोष सुरू झाला आहे. शहरात निकाल लागण्याआधीच एकनाथ खडसे यांच्या अभिनंदनाचे फलक लागले आहेत. यावरून खडसे यांचा विजय निश्चित आहे याची खात्री असल्याचेच हे फलक सांगत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळत आहे.

विधानभवन परिसरात खडसे समर्थकांनी केली गर्दी

एकनाथ खडसे यांचे समर्थक हे मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. खडसेंचे निवासस्थान आणि विधानभवन परिसरात त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने असल्याचे दिसून आले. या समर्थकांना एकनाथ खडसे यांचा विजय निश्‍चित वाटत आहे. तर हेच चित्र मुक्ताईनगरातही दिसून आले आहे. विधानभवन परिसरात खडसे समर्थकांकडून घोषणाबाजीही ऐकायला मिळत आहे. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक चुरशीची मानली जात आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार रामराजे निंबाळकर यांना पहिल्या पसंतीची मते मिळणार असून, एकनाथ खडसे यांना त्यांच्यानंतर मते मिळणार आहे. असे असले तरी राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे.  

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकeknath khadseएकनाथ खडसे