शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Dhananjay Munde: “खूप सहन केलं, आता पोलीस बघून घेतील”; रेणू शर्मा अटकेवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 19:08 IST

Dhananjay Munde: रेणू शर्मा ही महिला मूळ इंदोर मध्य प्रदेशातील असून, ती करुणा शर्माची बहीण आहे.

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडे एका महिलेने पाच कोटी रुपयांच्या खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यासंबंधित मलबार हिल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर धनंजय मुंडेंना धमकी देणाऱ्या महिलेला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. रेणू शर्मा असे या महिलेचे नाव आहे. रेणू शर्मा यांना अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या प्रकरणावर भाष्य केले आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून हा त्रास सुरू आहे. यापूर्वी त्यांनी एक खोटी तक्रार माझ्याविरोधात केली होती. नंतर ती तक्रार परत घेतली. ज्या काही गोष्टी गेल्या दीड-दोन वर्षांत झाल्या, जे काही सहन करत होतो. सगळ्या गोष्टी सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यानंतर शेवटी पोलिसांमध्ये ही तक्रार द्यावी लागली. तक्रार देताना पोलिसांना माझ्याकडून जे काही पुरावे द्यायचे, त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता यात जे काय करायचे ते पोलिसांना करायचे आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले. 

धनंजय मुंडेंविरोधात बलात्कार केल्याचा आरोप

रेणू शर्मा या महिलेने मागील वर्षी जानेवारी महिन्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याचा आरोप करत खळबळ माजवली होती, त्यानंतर काही दिवसातच तिने सदर तक्रार माघारी घेतली होती. तेव्हापासून रेणू शर्मा ही मेसेज, व्हॉट्स अ‍ॅप तसेच फोन करून पैशांची मागणी करत होती, यासंदर्भातील सर्व पुरावे पोलिसात दिले असल्याचेही धनंजय मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. फेब्रुवारी आणि मार्चदरम्यान एका परिचित महिलेने धनंजय मुंडे यांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून फोन करून खंडणीची मागणी केली. या महिलेने आपल्याकडे पाच कोटी रुपये आणि पाच कोटी रुपयांचे दुकान तसेच एक महागडे घड्याळ मागितल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच ही मागणी पूर्ण न झाल्यास बलात्काराची तक्रार करण्याची तसेच सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी रेणू शर्माने दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, रेणू शर्मा ही महिला मूळ इंदोर मध्य प्रदेशातील असून ती करुणा शर्माची बहीण आहे. धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनंतर मुंबई क्राईम ब्रांच आणि इंदोर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला अटक करून आधी इंदोर कोर्टात हजर केले, इंदोर कोर्टाने तिचा ताबा दिला आणि त्यानंतर सदर महिलेला पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडे