शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

गौतम अदानींनी पुन्हा भेट घेण्यामागे कारण काय? खुद्द शरद पवारांनी केला खुलासा; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 13:48 IST

Gautam Adani-Sharad Pawar Meet: गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यात झालेल्या भेटीमागे सिंगापूर कनेक्शन असल्याचे म्हटले जात आहे.

Gautam Adani-Sharad Pawar Meet: एकीकडे काँग्रेसने हिंडेनबर्ग अहवालावरून अदानी समूहावर प्रश्नांची सरबत्ती करत हल्लाबोल केला असून, दुसरीकडे अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. काही दिवसांपूर्वी गौतम अदानी हे शरद पवार यांना भेटले होते. लगेच पुन्हा एकदा गौतम अदानी शरद पवार यांच्या भेटीला गेल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. या भेटीबाबत खुद्द शरद पवार यांनी खुलासा केला आहे. 

हिंडनबर्ग अहवालानंतर विरोधक अदानी समूह आणि केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विरोधकांनी जेपीसीची मागणी केली आहे. पण, याउलट शरद पवारांनी जेपीसीची गरज नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. यानंतर आता पुन्हा एकदा गौतम अदानी यांनी शरद पवारांची भेट घेतली. 

गौतम अदानींनी पुन्हा भेट घेण्यामागे कारण काय?

गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यातील ही बैठक तब्बल अर्धा तास चालली होती. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, ही भेट टेक्निकल होती. सिंगापूर येथील एक प्रतिनिधीमंडळ माझ्याकडे आले होते आणि त्यांना काही टेक्निकल मुद्द्यांवर उद्योगपती गौतम अदानी यांची भेट घ्यायची होती. यादरम्यान गौतम अदानी आणि सिंगापूर प्रतिनिधीमंडळ यांच्यात ही बैठक झाली. मात्र हा टेक्निकल मुद्दा होता. त्यामुळे याबद्दल मला अधिक काही माहिती नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, शरद पवारांनी या बैठकील टेक्निकल म्हणत विषय टाळला असला तरी महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात यामुळे चर्चांना उधाण आले आहे. याआधी हिंडनबर्ग रिपोर्ट प्रकरणात गौतम अदानी यांची बाजू घेतली होती. त्यामुळे याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारGautam Adaniगौतम अदानी