शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचा जन्मच नैसर्गिक नाही; काँग्रेसमधून बाहेर पडलेला पक्ष, मुनगंटीवार यांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 02:43 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच नैसर्गिक नाही, काँग्रेसमधून बाहेर पडलेला हा पक्ष आहे. त्यामुळे भाजपाबद्दल बोलण्याचा त्यांना अधिकारच नाही, असा टोला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी लगावला.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच नैसर्गिक नाही, काँग्रेसमधून बाहेर पडलेला हा पक्ष आहे. त्यामुळे भाजपाबद्दल बोलण्याचा त्यांना अधिकारच नाही, असा टोला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी लगावला. विधान परिषदेचे विद्यमान विरोधी पक्ष नेते भाजपात होते. भाजपाचे गुणगान करत होते, ते राष्टÑवादीत आलेले त्यांना चालतात. मात्र राष्ट्रवादीचे विचार पटले नाहीत म्हणून कोणी भाजपात आले की यांना पोटशूळ होतो, असा चिमटाही मुनगंटीवार यांनी काढला.महामंडळाच्या नियुक्त्या झाल्या, तसाच मंत्रिमंडळ विस्ताराचाही मुहूर्त येईल. नरेंद्र पाटील यांचा भाजपाकडे कल असण्यावर राष्टÑवादीने आक्षेप घेतला आहे. राष्टÑवादीचा विचार पटला नाही म्हणून ते भाजपात आले. त्यांच्या क्षमतेचा उपयोग करण्यासाठी त्यांना समितीचे पद दिले गेले आहे. राष्ट्रवादी लोकांच्या विस्मरणाचा फायदा घेते, असे त्यांनी सांगितले.पक्षात बाहेरून आलेल्यांना पदे दिली जातात आणि वर्षानुवर्षे पक्षाचे कार्य करणाऱ्यांना उपाशी ठेवले जाते, हे योग्य आहे का? असे विचारता मुनगंटीवार म्हणाले, भाजपाची सदस्य संख्या कोटींच्या घरात आहे आणि सर्वांना पद देणे शक्य नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना डावलण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपाचा कार्यकर्ता पदासाठी काम करीत नाही. मुख्यमंत्री, अर्थमंत्री, चंद्रकांतदादा असे कार्यकर्ते आहेत, जे पुढच्या जन्मातही भाजपातच राहतील.‘संघर्ष जनतेसाठी नसून सत्तेसाठी’काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेवर मुनगंटीवार यांनी टीका केली. ते म्हणाले, जातीय द्वेष निर्माण करण्याचा राजकीय प्रयत्न विरोधकांनी केला. मात्र जळगाव व सांगलीच्या निवडणुकांतून जनतेचा विश्वास भाजपावर आहे, हे स्पष्ट झाले. काँग्रेसचा संघर्ष सत्ताप्राप्तीसाठी आहे. स्वत:च्या १५ वर्षांबद्दल काँग्रेस काहीच बोलत नाही. त्या काळात जे पराक्रम केले, ते लक्षात घेता कितीही यात्रा काढल्या तरी मंत्री होण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस