शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

राष्ट्रवादी आणि रालोआत नव्या ‘मैत्री’साठी चर्चा, भेटीगाठी सुरू ; पक्षांतर्गत मतभेदांमुळे तूर्तास निर्णय लांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 02:43 IST

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी  काँग्रेस रालोआत सामील होण्याच्या मुद्यावरून संभ्रमात आहे. संपूर्ण पटकथा लिहिण्यात आल्यानंतरही केवळ राष्ट्रवादी  काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे

शीलेश शर्मा नवी दिल्ली : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस रालोआत सामील होण्याच्या मुद्यावरून संभ्रमात आहे. संपूर्ण पटकथा लिहिण्यात आल्यानंतरही केवळ राष्ट्रवादी  काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे रालोआत सामील होण्याच्या संदर्भात अद्याप पक्षाला कोणताही ठोस निर्णय घेता आलेला नाही, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.राष्ट्रवादी  काँग्रेस आणि रालोआ यांच्यात समझोता व्हावा, यासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल प्रयत्नशील आहेत. प्रफुल्ल पटेल यांनी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांची तीनदा भेट घेऊन या नव्या आघाडीची पार्श्वभूमी तयार केली. पटेल आणि अमित शाह यांच्यादरम्यानची पहिली भेट गुजरात राज्यसभा निवडणुकीच्या आधी म्हणजे २६ जुलै रोजी झाली.काँग्रेस नेते अहमद पटेल यांना पराभूत करण्यासाठी गुजरातमधील राकाँच्या दोन आमदारांनी भाजपाच्या बाजूने मतदान करण्याची योजना या बैठकीत ठरली होती, असे सूत्रांनी सांगितले.मोठे नुकसान होऊ शकते-सुप्रिया सुळे यांनीही अमित शाह यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. या भेटीगाठीनंतरही राकाँ आणि अमित शाह यांच्यादरम्यान समझोता होऊ शकला नाही. ‘ज्यांना अंतिम निर्णय घ्यावयाचा आहे, ते पक्षाध्यक्ष शरद पवार हे या नव्या ‘मैत्री’साठी सध्या तयार नाहीत,’ असे राकाँच्या एका वरिष्ठ नेत्याने स्पष्ट केले. या दिशेने पाऊल टाकले तर महाराष्टÑाच्या राजकारणात राकाँच्या अस्तित्वाला मोठे नुकसान होऊ शकते, अशी भीती शरद पवार यांना वाटत आहे. त्यासोबतच रालोआत सामील होण्याच्या मुद्यावरून राकाँतच मतभेद असल्याचे संकेत मिळाले आहेत.केंद्रीय मंत्रिमंडळात राष्टÑवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची संख्या किती राहील, यावरून अमित शाह आणि पटेल यांच्यात एकमत होऊ शकले नाही, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. असे असले तरी भाजपाला राजकीय फायदा मिळवून देण्यासाठी राष्टÑवादी काँग्रेसने गुजरातमध्ये काँग्रेसविरुद्ध आघाडी उघडलेली आहे. भाजपाच्या अधिक जवळ जाता यावे, हा त्यामागचा उद्देश आहे.पटेल आणि शाह यांच्या याच भेटीत राकाँ आणि रालोआ यांच्यात संभाव्य आघाडी तयार करण्याबाबतचा आराखडा तयार झाला. तथापि, राकाँ रालोआत सामील होणार असल्याच्या बातम्या झळकल्यावर मात्र पटेल आणि सुप्रिया सुळे यांनी ‘ही सर्व अटकळबाजी आहे’, असे सांगून या वृत्ताचे खंडन केले होते. परंतु पटेल यांनी शाह यांची भेट का घेतली, या प्रश्नावर राकाँ नेते मौन धारण करून आहेत.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीNarendra Modiनरेंद्र मोदी