शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

Maharashtra Political Crisis: “‘५० खोके एकदम ओके’ हे चांगलंच झोंबलेलं दिसतंय”; अमोल मिटकरींचा शिंदे-भाजप सरकारला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 13:23 IST

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मुद्द्यांवरून विरोधी बाकावर बसलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने निशाणा साधला जात आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून हे सरकार गरिबांसाठी असून, सर्वसामान्यांना न्याय देणार असल्याचा विश्वास दिला जात आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.  ‘५० खोके एकदम ओके’ हे चांगलेच झोंबलेले दिसतेय, असा खोचक टोला अमोल मिटकरींनी लगावला आहे. 

सध्या शिंदे-फडणवीस सरकारचे पहिले विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचे सुरुवातीचे दोन दिवस विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विविध मुद्द्यांवरून आंदोलन करत सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. विधानसभेतही विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना सत्ताधारी सदस्यांची भंबेरी उडाल्याचे पाहायला मिळाले. यावरूच अमोल मिटकरी यांनी सरकावर टीका केली आहे. 

‘५० खोके एकदम ओके’ हे चांगलंच झोंबलेलं दिसतंय

अमोल मिटकरींनी केलेल्या एका ट्विटमध्ये, सत्ताधाऱ्यांना वारंवार सांगावे लागते आहे, हे सरकार गोर गरिबांसाठी काम करते आहे, हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे, याचं कारण "५० खोके एकदम ओके" हे  चांगलच झोंबलेलं दिसतंय, असा टोला लगावला आहे. तत्पूर्वी, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर, शिंदे गटाच्या बंडाचे केंद्र असलेल्या गुवाहाटीचा संदर्भ देत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घोषणा दिल्या. गद्दारांना भाजपची ताट-वाटी, चलो गुवाहाटी,चलो गुवाहाटी!, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. 

दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केलेल्या घोषणांनी विधिमंडळ परिसर दुमदुमुन निघाला. ५० खोके एकदम ओके!, रोक घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो!, सुधीरभाऊंना चांगलं खातं न सरकारचा धिक्कार असो!, अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी यावेळी सरकारचा निषेध केला. आले रे आले गद्दार आले, असे म्हणत त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAmol Mitkariअमोल मिटकरीEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस