शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

Maharashtra Politics: “राज्यातील शेतकरी संकटात, पण स्वत:चे हसरे चेहरे दाखवण्यासाठी करोडोंचा चुराडा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 17:33 IST

Maharashtra News: राज्याच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अजित पवारांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका.

Maharashtra Politics: एकीकडे राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून राज्यातील राजकारण तापलेले असताना दुसरीकडे राज्याच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ राज्यपाल बैस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. यातच चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधक बहिष्कार घातला आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. 

राज्यातील शेतकरी संकटात असताना दुसरीकडे स्वत: सरकार स्वत:चे हसरे चेहरे दाखवण्यासाठी करोडोंचा चुराडा करत असल्याची घणाघाती टीका अजित पवार यांनी केली आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी फिरत असताना लोकांनी आपली कैफियत मांडली. शेतकऱ्यांना सरकारकडून जाहीर केलेली मदत अद्यापही  मिळाली नाही. शेतकरी आत्महत्येत वाढ होत असल्याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले. 

वाढत्या महागाईमुळे शेती उत्पादन खर्च वाढला

वाढत्या महागाईमुळे शेती उत्पादन खर्च वाढला आहे. पण त्या तुलनेत शेतमालाला भाव मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूरमधील शेतकऱ्याला कांदा विक्री केल्यानंतर अवघ्या दोन रुपयांचा चेक मिळाला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत चालला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्यांला चांगला भाव सरकारने जाहीर करून निर्यात वाढवण्यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली. 

दरम्यान, जाहिरातींवर ५० कोटी सरकारने खर्च केले आणि मुंबई महापालिकेने १७ कोटी रुपये जाहिरातींवर खर्च केले आहेत. आपले हसरे चेहरे दाखवण्यासाठी ही उधळपट्टी सुरू आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर मिळत नाही आणि दुसरीकडे महामंडळाच्या पानभर जाहिराती प्रसिद्ध होत आहे. हा प्रकार चिड आणणारा आहे, अशी टीका अजित पवारांनी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Budget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनAjit Pawarअजित पवार