शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाच्या मृत्यू प्रकरणात नायर रुग्णालयातील डॉक्टर, वॉर्डबॉय, महिला कर्मचा-याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 21:36 IST

नायर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एमआरआय रुममध्ये तरुणाच्या झालेल्या अपघाती मृत्यूप्रकरणी तीन जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई- नायर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एमआरआय रुममध्ये तरुणाच्या झालेल्या अपघाती मृत्यूप्रकरणी तीन जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच डॉक्टर, वॉर्डबॉय, महिला कर्मचा-यांवर गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. डॉ. सिद्धांत शहा, वॉर्डबॉय विठ्ठल चव्हाण, महिला कर्मचारी सुनीता सुर्वे यांचं निलंबन करत त्यांच्यावर भादंवि 304 गुन्ह्यांतर्गत अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य सरकारानं मृताच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत देऊ केली आहे. या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तरुणाच्या मृत्यूनंतर भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांनी नायर रुग्णालयाचे डीन यांना धारेवर धरले असून, त्यांच्याच कार्यालयात बसून निषेध आंदोलन केलं होतं. अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव राजेश मारूची असून, आजारी असलेल्या आईला त्यानं एमआरआय चाचणीसाठी नेले असताना ही दुर्घटना घडली आहे. एमआरआय चाचणीसाठी आईला नेत असताना रूमबाहेर असलेल्या वॉर्डबॉयने राजेशच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि घड्याळ सुरक्षिततेच्या दृष्टीनं काढून ठेवण्यास सांगितले. परंतु त्याच वेळी वॉर्डबॉयनं रुग्णासाठीचा ऑक्सिजन सिलिंडर राजेशला आत नेण्यास सांगितलं.राजेशनं त्याला विरोध केला असता, वॉर्डबॉयने एमआरआय मशीन बंद असल्याचं सांगितलं होतं. त्याच दरम्यान राजेश रुममध्ये गेला आणि एमआरआय मशिनने तात्काळ सिलिंडरसकट राजेशला ओडून घेतले. सिलिंडरला पकडून राजेशही या मशिनमध्ये अडकला गेला. त्यानंतर सिलिंडरचे झाकण एमआरआय मशीनमध्ये उघडले गेले आणि त्यातील वायू हा राजेशच्या पोटात गेला. वॉर्डबॉयनं अथक प्रयत्न करून राजेशला बाहेर काढले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.