शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव-भीमा हिंसाचारात हात? कल्याणमधून अटक करण्यात आलेल्या 7 नक्षलवाद्यांवर संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2018 09:23 IST

राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी कल्याणमधून ७ नक्षलवाद्यांना अटक केली. ते मूळचे तेलंगणाचे रहिवासी असून त्यांना १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. कोरेगाव - भीमा घटनेनंतर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये झालेल्या हिंसाचारात त्यांचा सहभाग असल्याचा संशय

मुंबई : राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी कल्याणमधून ७ नक्षलवाद्यांना अटक केली. ते मूळचे तेलंगणाचे रहिवासी असून त्यांना १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. कोरेगाव - भीमा घटनेनंतर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये झालेल्या हिंसाचारात त्यांचा सहभाग असल्याचा संशय असून त्यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली.

सीपीआय (माओ) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेसाठी काम करत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. मुंबईच्या घाटकोपर येथील कामराजनगर, रमाबाईनगर, विक्रोळी आणि डोंबिवली परिसरात हे सात जण राहत होते. शुक्रवारी रात्री ते कल्याण रेल्वे स्थानकात एकत्र येणार असल्याची माहिती एटीएसला मिळाली. त्यानुसार, पथकाने सापळा रचून सातही जणांना ताब्यात घेतले. एटीएसच्या कुठल्याच प्रश्नांची समाधानकारक उत्तरे त्यांना देता न आल्याने संशय बळावला. त्यांच्या चौकशीत ते नक्षली संघटनेसाठी काम करतअसल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे आक्षेपार्ह मजकूर असलेली कागदपत्रे तसेच बॅनर आढळून आले.

सातही जण ते ३० ते ५२ वयोगटातील आहेत. तेलंगणाच्या करीमनगर आणि नालगोंडा येथील हे रहिवासी आहेत. ते आणि त्यांचे काही सहकारी सीपीआय (माओ) या बंदी घातलेल्या संघटनेसाठी काम करत असल्याची कबुली त्यांनी एटीएसला दिली आहे. या सर्वांना बेकायदा कारवाया (प्रतिबंधक) कायदा, १९६७ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावnaxaliteनक्षलवादीthaneठाणेArrestअटकkalyanकल्याण