शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भंडा-यातील नागझिरा गेटवर आढळले नक्षली बॅनर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2017 13:37 IST

भंडारा : नक्षलवाद्यांचा रेस्ट झोन म्हणून ओळखल्या जाणा-या नागझिरा परिसरात नक्षलवादी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

भंडारा : नक्षलवाद्यांचा रेस्ट झोन म्हणून ओळखल्या जाणा-या नागझिरा परिसरात नक्षलवादी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान ३१ डिसेंबरच्या पहाटेच्या सुमारास साकोलीकडून नागझिराकडे जाणा-या पिटेझरी मार्गावर लाल सलाम-नागझिरा बंद, दम है तो नागझिरा आओ लाल सलाम, असे लिहिलेले फलक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.लाल कपड्यावर नागझिरा बंद लिहिलेले जमनापूर व पिटेझरीकडे जाणा-या टी-पार्इंटवर हे बॅनर तुली सुटसच्या लोखंडी खांबाला बांधलेले आढळून आले. मात्र हे बॅनर कोणत्या दलमने लावले, याचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे हे बॅनर नक्षल्यांनी लावले की कुणी खोळसाळपणा केला, या दिशेने पोलीस प्रशासनाकडून शोध घेण्यात येत आहे. 

बॅनर लावलेल्या परिसरात जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्यासह भंडारा व साकोली पोलिसांची कुमक तैनात आहे. साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांच्याशी संपर्क साधला असता घटनास्थळावर असल्याचे सांगून माहिती नंतर देत असल्याचे सांगितले.टी-पॉर्इंट परिसरात दोन बॅनर्स लावलेले दिसून आले. हे बॅनर्स कुणी लावले याचा शोध घेणे सुरू आहे. याठिकाणी पोलिसांना अलर्ट करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यात नक्षली कारवाया नाहीत. आॅपरेशन डिटेल्सची माहिती देता येऊ शकणार नाही.- विनिता साहू, जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा