शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

नवाब मलिक यांच्या जावयाला पुरावे नसल्याने जामीन मंजूर, विशेष न्यायालयाच्या निर्णयाला एनसीबी उच्च न्यायालयात आव्हान देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 08:24 IST

Court News:

मुंबई :  राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या विरोधात पुरावे नसल्याचे निरीक्षण नोंदवत विशेष एनडीपीएस न्यायालयाने समीर  खान व अन्य दोघांची गेल्याच महिन्यात जामिनावर सुटका केली. दरम्यान, विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला एनसीबी उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या महिन्यात न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत बुधवारी उपलब्ध झाली. समीर खान यांना १३ जानेवारी रोजी ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) अटक केली. खान हे ड्रग्ज विक्रीत सहभागी आहेत व ते ड्रग्जचे सेवनही करत असल्याचा  आरोप एनसीबीने केला आहे. रासायनिक पृथक्करण अहवालानुसार, पोलिसांनी जप्त केलेल्या ११ नमुन्यांत गांजाचे प्रमाण आढळले नाही. तसेच खान हे कटात सहभागी असल्याचे सिद्ध करणार पुरावे सादर केले नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

जावयाकडे गांजा नाही, हर्बल तंबाखू सापडला - मलिक- ‘माझ्या जावयाकडे कोणत्याही प्रकारचा गांजा आढळून आला नाही. हर्बल तंबाखू सापडल्याचे न्यायालयाच्या आदेशात दिसतेय. एनसीबीला गांजा आणि हर्बल तंबाखूतील फरक कळत नाही का?’ असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.- मलिक म्हणाले की, या प्रकरणात माझे जावई समीर खान यांना गोवण्यात आले. त्याविरुद्ध ते उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. विशिष्ट बातम्या पसरवून काही लोकांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे. पतीच्या अटकेचा माझ्या मुलीवर आणि नातवावर विपरित परिणाम झाला. - माझे जावई ड्रग डीलर असल्याचे आरोप भाजपवाले आजही करीत असल्याने मला आज बोलावे लागत आहे. माझा जावई आणि अन्य दोघांना एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने साडेआठ महिन्यांनंतर तुरुंगातून सोडले. न्यायाधीशांच्या आदेशात कुठेही समीर खानकडे गांजा सापडल्याचा उल्लेख नाही, असा दावाही मलिक यांनी केला.

भाष्य करणे चुकीचेनवाब मलिक यांच्या जावयाला अटक झाल्यानंतर त्यांची बहुतेक जनमानसात बदनामी झाली असावी, त्याची त्यांना मळमळ असावी. त्यामुळेच ते दर दिवशी केवळ सूडभावनेने तपास यंत्रणाविरुद्ध वक्तव्ये करीत आहेत. जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यावर भाष्य करणे चुकीचे आहे.- प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद. 

मलिक यांना वाय दर्जाची सुरक्षागेल्या काही दिवसांपासून भाजप व एनसीबीवर कडाडून टीका करणारे मलिक यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून, त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. आपल्याला सातत्याने धमक्या येत असल्याने राज्य सरकारने सुरक्षा वाढविली असल्याचे मलिक यांनी सांगितले. मलिक यांच्या ताफ्यात आता पायलट कारसह चार रिव्हाॅल्व्हरधारी रक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी त्यांच्या सुरक्षेसाठी पिस्तूलसह एक पोलीस गार्ड सोबत होता. 

एनसीबीचा सावध पवित्रामलिक यांच्या आरोपांवर एनसीबीने मात्र सावध पवित्रा घेतला आहे. मलिक यांच्या आरोपानंतर त्याबाबत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी, या प्रकरणात आम्ही वरच्या न्यायालयात अपील केले आहे. न्यायप्रविष्ट बाब असल्याने त्याबाबत काहीही बोलू शकत नाही, इतके सांगून अधिक बोलण्यास नकार दिला.

टॅग्स :Courtन्यायालयnawab malikनवाब मलिकNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो