शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

Nawab Malik : देवेंद्र फडणवीसांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबाबत नवाब मलिक काय गौप्यस्फोट करणार? आजच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 09:00 IST

Nawab Malik : देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देत आता नवाब मलिक पुन्हा एकदा माध्यमांसमोर येणार आहेत.

मुंबई : राज्यात आर्यन खान आणि मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडत आहेत. काल भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्ती, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून साडेतीन कोटींची जमीन फक्त 20 लाखांत खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. यानंतर नवाब मलिकांनीही पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता. 

देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देत आता नवाब मलिक पुन्हा एकदा माध्यमांसमोर येणार आहेत. आज सकाळी 10 वाजता नवाब मलिक पत्रकार परिषद घेणार आहेत. यासंदर्भात नवाब मलिक यांनी ट्विट केले आहे. "त्यांची झोप उडाली आहे, आता शांतता गमावण्याची वेळ आली आहे, भेटुया आज  सकाळी 10 वाजता", असे ट्विट करत नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 

दरम्यान, मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर नवाब मलिक यांनी म्हटले होते की, उद्या सकाळी देवेंद्र फडणवीसांचे अंडरवर्ल्डशी असलेले नाते उघड करणार आहे. तसेच, देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना अंडरवर्ल्डच्या साथीने राज्य वेठीस धरले होते, असेही नवाब मलिकांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस माझे नाव खराब करण्याचे काम करत आहेत. मागेही पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी माझ्या जावयाच्या घरात गांजा सापडला होता. याप्रकरणी माझी मुलगी तुम्हाला नोटीस पाठवत आहे, असेही नवाब मलिकांनी सांगितले होते. त्यामुळे नवाब मलिक आज नेमका काय गौप्यस्फोट करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

नवाब मलिकांचे अंडर्वल्डशी संबंध - देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्ती, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून साडेतीन कोटींची जमीन फक्त 20 लाखांत खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच, सलीम पटेल कोण होता, त्यानं तुम्हाला इतक्या स्वस्तात जमीन का विकली? असे सवाल देखील नवाब मलिक यांना केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबीयांशी संबंध असल्याचा घणाघात केला. नवाब मलिक यांच्या मुलाचे थेट संबंध दाऊद इब्राहिमसोबत असल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत केला.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस