शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Exclusive: 'जावयावरील कारवाईमुळे वानखेडेंवर आरोप करत आहात?' नवाब मलिक म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 16:44 IST

'मी कधीच शाहरुख खानला भेटलो नाही, त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी हे केलं नाही.'

मुंबई: क्रुज ड्रग्स पार्टी प्रकरणानंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे(Sameer wankhede) यांचे नाव चांगलेच चर्चेत आले. पण, यानंतर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले. मलिकांनी वानखेडेंवर बनावट कागदपत्र सादर करणे, लग्नासाठी धर्म बदलणे अशाप्रकारचे आरोप केले. यानंतर वानखेडे यांच्याकडून त्यांना स्पष्टीकरणही देण्यात आलं. या सर्व प्रकरणावर आज नवाब मलिक यांनी लोकमतशी सविस्तर चर्चा केली. यात त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.

माझ्या जावयाकडे हर्बल तंबाखू होती...लोकमतशी बोलताना मलिकांना विचारण्यात आलं की, तुमच्या जावयावर कारवाई करुन तुरुंगात टाकलं म्हणून तुम्ही सुडबुद्धीने हे करताय? त्यावर नवाब मलिक म्हणाले, 'जावयावरील कारवाईमुळे सुड बुद्धीने मी हे करत नाहीये. मुळात माझ्या जावयाविरोधात रचलेल हे कटकारस्थान होतं. माझ्या जावयाने कधीच गांजाचा व्यवसाय केला नाही. जावयाच्या एका मित्राने हर्बल तंबाखुचा व्यवसाय सुरू केला होता. त्याने माझ्या जावयालाही त्या बिझनेसमध्ये येण्यास सांगितलं.' 

'काही दिवसानंतर एनसीबीने जावयाला समन्स पाठवल्याच्या बातम्या माध्यमांवर पाहिल्या. हे समन पाठवल्यानंतर सर्व मीडिया माझ्या मागे लागला. याच्या काही दिवसानंतर जावयाला अटक करण्यात आली आणि त्याच्याकडे दोनशे किली गांजा असल्याच्या बातम्या समोर आल्या. पण, मुळात तो गांजा नव्हताच, ती हर्बल तंभाखू होती. जावयाला अटक झाल्यानंतर त्या तंबाखूचे नमुने प्रयोगशाळे पाठवले, त्यात हा गांजा नसल्याचे समोर आले', अशी माहिती मलिकांनी दिली. 

एनसीबीच्या बोगस प्रकरणांची माहिती मिळालीयानंतर मलिक म्हणाले की, काहीजण म्हणत आहे की, माझ्या सावयावर कारवाई केली म्हणून मी सुडाचं राजकारण करत आहे. पण, तसच नाहीये. मी त्या शाहरुख खानला(Shahrukh Khan) कधीच भेटलो नाही, त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी हे करत नाहीये. समीर वानखेडेने माझ्या जावयावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली, तेव्हापासूनच मी एनसीबीच्या बोगस प्रकरणांबाबत माहिती घेत होतो. यातच हे आर्यन खानचे प्रकरण समोर आले, यालाही चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आले. फक्त आर्यन आणि माझा जावईच नाही, तर अनेक लोकांना अशा बोगस प्रकरणांमध्ये अडकवण्यात आलं आहे. या सर्व प्रकरणांचा अभ्यास केल्यानंतर मी वानखेडेविरोधात बोलणे सुरू केले, असंही ते म्हणाले.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकSameer Wankhedeसमीर वानखेडेAryan Khanआर्यन खानNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो