Nawab Malik, Sameer Wankhede : "...त्यानंतर भाजपा नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही; हिवाळी अधिवेशनात नावं जाहीर करणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 11:27 AM2021-10-29T11:27:49+5:302021-10-29T11:30:54+5:30

Nawab Malik on Sameer Wankhede : नवाब मलिक यांचा इशारा. काशिफ खानला अटक झाल्यानंतर पोलखोल होणार असल्याचा मलिक यांचा दावा.

nawab malik speaks on sameer wankhede will tell name in maharashtra assemby session drug case | Nawab Malik, Sameer Wankhede : "...त्यानंतर भाजपा नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही; हिवाळी अधिवेशनात नावं जाहीर करणार"

Nawab Malik, Sameer Wankhede : "...त्यानंतर भाजपा नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही; हिवाळी अधिवेशनात नावं जाहीर करणार"

Next

"भाजपचे नेते आणि त्यांचे राईट हँड हे कालपासून समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची भेट घेत आहेत. येत्या हिवाळी अधिवेशनामघ्ये मी त्या नेत्यांची नावं जाहीर करणार आहे. त्यानंतर या लोकांना महाराष्ट्रात तोंड दाखवणं मुश्किल होणार आहे," असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेदरम्यान हा दावा केला. 

"महिन्याभरापूर्वी परिस्थिती निराळी होती. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. कालपासून भाजपचे नेते आणि त्यांचे राईट हँड हे वानखेडेंची भेट घेत आहेत. काशिफ खान याला अटक केल्यानंतर अनेकांची पोलखोल होईल. त्याच्याकडे किती लोकांचे पैसे आहेत हे उघड होईल. विधानसभेचं हिवाळी अधिवेशन वादळी होईल," असंही मलिक म्हणाले.

अधिवेशनामध्ये माझ्या नावाने हल्लाबोल होईल , मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाईल, विषयांतर करावं म्हणूनही प्रयत्न होईल. परंतु मी कोणाचं नाव घेऊन विषयांतर करणार नाही. मोठी नावं अधिवेशनादरम्यान जाहीर करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. ड्ग्स पार्टीतील दाढीवाला सेक्स रॅकेट, ड्रग्ज रॅकेट चालवत आहे. त्याला अटक केली गेली नाही, ज्यानं पार्टीचं आयोजन केलं त्याला कसं सोडून दिलं जाऊ शकतं? पार्टीला आलेल्या १३०० लोकांचा तपास का झाला नाही, असा सवालही त्यांनी केला.

 

Web Title: nawab malik speaks on sameer wankhede will tell name in maharashtra assemby session drug case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.