शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

समीर वानखेडे वसुलीत सामील, नवाब मलिकांचा दावा; देवेंद्र फडणवीसांवरही केले आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 00:34 IST

"मी साधारणपणे ४५ वर्षांपासून राजकारणात आहे. मी कधीही राजकीय आघाडी उघडली नाही. पण मी आता अन्यायाविरुद्ध आघाडी उघडली आहे. निर्दोष लोकांना अडकवले जात आहे. मोठ्या प्रमाणावर वसुली होत आहे."

मुंबई - महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांचे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावरील हल्ले अद्यापही सुरूच आहे. मलिक सातत्याने वानखेडे यांच्यावर वसुलीचे आरोप करत आहेत. नवाब मलिक म्हणाले, मी साधारणपणे ४५ वर्षांपासून राजकारणात आहे. मी कधीही राजकीय आघाडी उघडली नाही. पण मी आता अन्यायाविरुद्ध आघाडी उघडली आहे. निर्दोष लोकांना अडकवले जात आहे. मोठ्या प्रमाणावर वसुली होत आहे. मी विभागा (NCB) विरोधात नाही, तर जे चुकीचे काम करत आहेत त्यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. लोकप्रियतेसाठी चित्रपटांत काम करणाऱ्यांना टार्गेट केले जात आहे, असा दावाही मलिक यांनी केला आहे. 

कुणीही ड्रग्ज घेत नाही, असे मी म्हणत नाही पण..."कुणीही ड्रग्ज घेत नाही, असे मी म्हणत नाही. पण, जे ड्रग्स घेतात, त्यांची शंका असेल तर त्यांचे रक्त, लघवीचे नमुने घ्या. चाचणीत पॉझिटिव्ह आल्यास कोर्टात उभे करा. अशा लोकांना जामीन मिळतो. त्यात एक वर्षाची शिक्षा आहे. त्यांना पुनर्वसन केंद्रात पाठवले जाते. वानखेडे यांना विभागात आणले गेले तेव्हा सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण होते. त्यावरून बरेच राजकारण झाले. त्यावेळी दीपिका पदुकोण, सारा अली खान यांना लक्ष्य करण्यात आले. फक्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी," असेही मलिक म्हणाले. ते एबीपी न्यूजसोबत बोलत होते.

देवेंद्र फडणवीसांवरही आरोप -नवाब मलिक म्हणाले, नीरज गुंडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जवळचा आहे. देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रीय यंत्रणांमध्ये हस्तक्षेप आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच येथे अधिकारी आणले जातात. हे मी जबाबदारीने बोलत आहे. नीरज गुंडे सर्व कार्यालयांत बसलेला असतो.

जावयाच्या अटकेसंदर्भात काय म्हणाले मलिक -ड्रग्ज प्रकरणात आपल्या जावयाच्या अटकेसंदर्भात बोलताना नवाब मलिक म्हणाले, ते जेव्हा तुरुंगात होते, तेव्हा साडे आठ महिने आम्ही काहीही बोललो नाही. जेव्हा फॉरेन्सिक अहवाल आला, तेव्हा त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे ड्रग्स नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर, त्यांना जामीन मिळाला. मात्र, जेव्हा मी यावर बोलायला सुरुवात केली, तेव्हा काही पत्रकारांनी सांगितले, की समीर वानखेडे तुमच्यावर नाराज आहे. मला त्यांच्याबद्दल सर्व काही माहित आहे, असेही मलिक म्हणाले.

नवाब मलिक म्हणाले, वसुली केलेल्या पैशांतून समीर वानखेडे महागडे कपडे परिधान करतात. त्यांचे उत्पन्न किती आहे? एक अधिकारी दररोज दोन लाख रुपयांचे बूट कसे घालतो आणि 75 हजारांचा शर्ट कसा घालू शकतो. आम्ही एका दिवसात कोणतीही माहिती गोळा केलेली नाही. त्यांनी डीआरआय आणि कस्टममध्ये काम केले आहे. ते भ्रष्ट आहेत, असा आरोपही मलिक यांनी केला आहे. 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSameer Wankhedeसमीर वानखेडे