शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Navratri 2021: कोल्हापूरच्या प्रिया पाटीलचा अनोखा सेवाभाव; मृत कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी शववाहिकेचे सारथ्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 07:16 IST

Navratri Special Stories: जाधववाडी येथे राहणारी प्रिया ही विवेकानंद महाविद्यालयात बी.एस्सी. अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकत आहे. तिचे वडील  खाजगी कारखान्यात काम करतात

संतोष मिठारीकोल्हापूर : कोरोनाच्या भीतीने एकमेकांचा स्पर्शही अव्हेरला जात होता. कोरोनाचा संसर्ग झाला म्हणून वाळीत टाकण्याचा विदारक अनुभव अनेकांना येत असताना अशा परिस्थितीमध्ये सामाजिक बांधिलकी काय असते, याची प्रचीती कोल्हापुरातील वीस वर्षीय युवती प्रिया प्रकाश पाटील हिच्या कामगिरीतून आली. शववाहिकेवर चालक म्हणून सेवा देत तिने कोरोनाने मृत्यू पावलेल्या ४५० नागरिकांचे मृतदेह स्मशानभूमीत पोहोचविले. त्यातील बहुतांश मृतदेहांवर अंत्यसंस्कारही तिनेच केले.

जाधववाडी येथे राहणारी प्रिया ही विवेकानंद महाविद्यालयात बी.एस्सी. अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकत आहे. तिचे वडील  खाजगी कारखान्यात काम करतात. वडिलांच्या एका मित्राचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्याकरिता सात तासांची प्रतीक्षा करावी लागली. त्यावर प्रिया हिने अशा कोरोनाने मृत झालेल्या लोकांचे मृतदेह स्मशानभूमीपर्यंत पोहोचविण्यासाठी योगदान देण्याचे ठरविले. त्यासाठी तिला वडिलांनी शिकविलेल्या चारचाकी चालविण्याच्या कौशल्याचा उपयोग झाला. भवानी फाउंडेशनच्या माध्यमातून तिने  जून ते ऑगस्ट असे तीन महिने सेवा दिली. कोरोनाबाधितांना  रुग्णालयात दाखल करण्यापासून ते त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यापर्यंत आणि कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूनंतर मृतदेहाला शववाहिकेतून स्मशानभूमीपर्यंत नेऊन प्रसंगी अंत्यसंस्कार करण्याचे काम तिने केले. यातून तिने अनेकांचा दुवा घेतला.

तिच्या या सेवाभावी कार्याची दखल घेत सतेज पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवाजी विद्यापीठ, विवेकानंद कॉलेज, रोटरी क्लबने तिचा सत्कार केला. लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानने तिला रणरागिणी पुरस्कार जाहीर केला आहे. 

करून दाखविलेकोरोना काळात ही मुलगी काय सेवा देणार, असे अनेकांना वाटले. मात्र, सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने शववाहिकेवर चालक म्हणून सेवा देत मी अशक्य ते शक्य करून दाखविले. त्यासाठी मला आई-वडील, भाऊ पवन पाटील, भवानी फाउंडेशनचे अध्यक्ष हर्षेल सुर्वे, चैतन्य अष्टेकर, प्रदीप हांडे, राकेश सावंत यांंचे पाठबळ, तर सीपीआर, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाचे सहकार्य लाभले असल्याचे प्रिया हिने सांगितले.

कोणतेही क्षेत्र असू दे त्यामध्ये महिलांनी जिद्दीने कार्यरत राहावे. काहीवेळा टीका होईल; पण त्याकडे दुर्लक्ष करून उत्कृष्ट कामगिरी करावी. चांगल्या कामगिरीची समाज निश्चितपणे दखल घेतो. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला दूर ठेवण्यासाठी सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. -प्रिया पाटील

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या